यंदा 20 ऑक्टोबरला दिवाळीचा (Diwali 2025) मुख्य दिवस असून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाला विशेष प्रार्थना केली जाते. दिवाळीमध्ये प्रकाशाला खूप महत्त्व असून, या काळात दिव्यांनी संपूर्ण घर उजळून निघतं. असे मानले जाते की यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्यासोबत दिवाळीच्या दिवशी घडल्या तर लवकरच तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतात.
रात्री घुबड दिसणे
हिंदू धर्मात, घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. म्हणूनच, दिवाळीच्या रात्री जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा आजूबाजूला घुबड दिसला तर ते देवी लक्ष्मीच्या आगमनाचे चिन्ह मानले जाते. म्हणून, दिवाळीच्या दिवशी या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

गायीचे आगमन Diwali 2025
दिवाळीच्या सकाळी जर गाय तुमच्या दाराशी आली तर ते एक शुभ संकेत मानली जाते. याव्यतिरिक्त, जर दररोज सकाळी गाय तुमच्या घरी आली तर याचा अर्थ देव-देवता तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि तुमच्या घरात आनंद आणि सुख समृद्धी नांदणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही गायीला भाकरी खायला द्यावी.
काळया मुंग्या दिसणे
दिवाळीच्या दिवशी (Diwali 2025) तुमच्या घरात किंवा आजूबाजूला सरडे, उंदीर किंवा काळ्या मुंग्या दिसणे देखील शुभ मानले जाते. हे धनदेवता प्रसन्न झाल्याचे लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण होतील. याशिवाय दिवाळीच्या खास प्रसंगी जर एखादा साधू किंवा ऋषी तुमच्या घरी आले तर तुम्ही त्यांना भिक्षा देऊन निरोप द्यावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याची खात्री होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











