दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात प्रमुख आणि आवडता सण… इयत्ता 20 ऑक्टोबरला देशभरात दिवाळी साजरी केली जाईल..दिवाळीला लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि दिवाळी पाडवा या सणांना फार महत्त्व आहे. यामधील दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कारण, दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2025) साजरा केला जातो. यंदा 22 ऑक्टोबर 2025 ला बालिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. नवविवाहित वधु-वरांसाठी हा दिवस फार खास असतो. आज आपण दिवाळी पाडव्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत.
बलिप्रतिपदा पूजेला विशेष महत्व
दिवाळी पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण होय. या सणादिवशी बलिप्रतिपदा पूजेला विशेष महत्व देण्यात येते. तसेच, बळीराजाची रांगोळी काढून त्याला पुजले जाते. यादिवशी त्याची पूजा करून “ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असे म्हणले जाते. या दिवशी व्यापारी आपल्या आर्थिक नववर्षाला सुरुवात करतात. तसेच, शेतकरी बळी राजाची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा करतात.
पौराणिक कथा – Diwali Padwa 2025
पौराणिक कथा आपल्याला असे सांगते की, बलिप्रतिपदेतील बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. पाडव्या दिवशी या बळीराजाला तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून विष्णूच्या वामन अवताराने मारले होते. बळीराजा हा शेतकऱ्यांचे हित जपणारा होता. तो कधी ही आपल्या राज्यातील शेतकऱ्याला दुखी होऊ देत नव्हता. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी ग्रामीण भागात बळीराजाची पूजा करण्यात येते. तसेच, यादिवशी शेतकरी आपली अनेक शेतातील कामे मार्गी लावतात.
दरम्यान, दिवाळी पाडव्याला (Diwali Padwa 2025) पती आपल्या पत्नीला खास अशी भेट वस्तू देतो. तसेच, पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते. पाडव्याच्या सणापासून अनेक नव्या कामांना सुरुवात करण्यात येते. यासाठी पाडवा हा सण अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





