हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात संतुलित आणि आनंदी दैनंदिन जीवन राखण्यासाठी अनेक नियम सांगितले आहेत. यामध्ये सकाळ आणि संध्याकाळशी संबंधित विशिष्ट सूचनांचा समावेश आहे. काही मान्यतेनुसार, संध्याकाळी एखाद्याला काही वस्तू दिल्याने लक्ष्मी माता नाराज होते असे मानले जाते. एखाद्याला दानधर्म करणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे, मात्र हे करत असतानाही काही नियमांचे पालन आवश्यकच आहे. संध्याकाळ हा घरात सकारात्मक ऊर्जा जमा होण्याचा काळ मानला जातो. या काळात काही वस्तू कोणालाही देऊ नयेत असे म्हटलं जाते, मग समोरची व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असो.
हळद देऊ नका
रोजच्या जेवणातील वापरातील हळद म्हणजे शुभ, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर हळद दिल्याने घरात समृद्धी आणि शुभ ऊर्जा कमी होते. शिवाय, असे केल्याने देवी लक्ष्मीला राग येऊ शकतो, म्हणून यावेळी हळद किंवा हळदीशी संबंधित वस्तू कधीही देऊ नयेत.

पांढऱ्या गोष्टी
दूध, दही, तांदूळ आणि साखर यासारख्या पांढऱ्या गोष्टी शांत ऊर्जा आणि चंद्राशी संबंधित मानल्या जातात. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर या वस्तू दिल्याने घरात दुर्दैव येते. तसेच आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
सूर्यास्तानंतर झाडू मारू नका:
वास्तुशास्त्रात झाडूचा संबंध धनाची देवी लक्ष्मीशी आहे. लक्ष्मी माता ही संध्याकाळच्या वेळीच घरात वास करते. त्यामुळे संध्याकाळी घर झाडू केल्याने धनाचे नुकसान होते असे मानले जाते. तसेच घरातील सकारात्मक ऊर्जा देखील निघून जाते. तुम्हाला आर्थिक संकटाना सामोरे जाऊ लागू शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











