स्वप्न (Dream Meaning) म्हणजे मनाचा आरसा. आपल्याला अनेकदा रात्रीच्या झोपेत वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात. काही स्वप्ने ही आपल्यासाठी चांगली असतात तर काही तितकीच भयावह असतात. स्वप्नात कधी काय येईल याचा काही नेम नसतो. परंतु केवळ मानसिक नव्हे, तर धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही स्वप्नांना मोठं महत्त्व दिलं जातं. ज्योतिषशास्त्रात ‘स्वप्नशास्त्राला’ खूप महत्व आहे. यामध्ये स्वप्नांचे अर्थ आणि त्यांचे शुभ-अशुभ परिणाम दिसतात. काही स्वप्नं आयुष्यात चांगले संकेत देतात. त्यासाठी स्वप्नात तुम्हाला खालील गोष्टी दिसणे महत्त्वाचे आहे.
स्वप्नात गाय दिसणे
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात गाय दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू धर्मात गाय ही माता आहे आणि तिच्यात 33 कोटी देवी-देवतांचा वास असल्याचं मानलं जातं. जर स्वप्नात तुम्हाला गाय दिसली, तर याचा अर्थ देवी-देवता तुमच्यावर प्रसन्न आहेत. लवकरच तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. समाजात मान सन्मान मिळेल.

स्वप्नात घुबड दिसणे (Dream Meaning)
स्वप्नात घुबड दिसणे म्हणजे अचानकपणे धनलाभाचा संकेत. कारण घुबड हे समृद्धीचे प्रतीक असून ते लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते. त्यामुळे स्वप्नात घुबड दिसणे म्हणजे अचानकपणे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसा हा येणारच.
स्वप्नात हत्ती दिसण
हत्ती हा ऐश्वर्य, सामर्थ्य आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. स्वप्नात हत्ती दिसणे म्हणजे तुमच्या जीवनात सन्मान, वैभव आणि स्थिरता वाढणार आहे. अशा व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते आणि त्याचं आयुष्य समृद्ध आणि आनंदी होतं. (Dream Meaning)
स्वप्नात साप दिसणे
साप म्हटल की आपण घाबरतो, परंतु स्वप्नात साप दिसणे हे नेहमीच वाईट नसते. उलट, स्वप्नात काळा नाग दिसला तर ते धनलाभाचे आणि आर्थिक प्रगतीचे संकेत असते. लवकरच तुमचं नशीब फळफळू शकते.
स्वप्नात मोर दिसणे
मोर हा सौंदर्य, प्रेम आणि आनंदाचं प्रतीक आहे. जर स्वप्नात मोर दिसला, तर तो जीवनात आनंद, प्रेम आणि शुभवार्ता येण्याचा इशारा देतो. स्वप्नात मोर आल्याने जीवनात नवीन उत्साह आणि सकारात्मकता येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











