सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक गोड पदार्थ कायमच बनवले जातात. गोड पदार्थ बनवल्याशिवाय सण अपूर्ण वाटतात. त्यामुळे घरात काहींना काही गोड पदार्थ बनवला जातो. सणावाराच्या निमित्तानं, नैवेद्याचं ताट सजवायचं असतं. त्यासाठी खास सीताफळ बासुंदी कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. जाणून घ्या सीताफळ बासुंदी बनवण्याची सोपी रेसिपी….
साहित्य
- सीताफळ
- दूध
- साखर
- वेलची पावडर
- सुका मेवा (बदाम, पिस्ता)
कृती
- सीताफळ फोडून त्यातील गर बिया वेगळ्या करून घ्या. गर काढण्यासाठी बोटांनी चोळण्याऐवजी चमचा किंवा चाकूने हलकेच गर काढून घ्या.
- एका जाड भांड्यात दूध घ्या आणि मध्यम आचेवर ते उकळून थोडे घट्ट होईपर्यंत (कमीतकमी १/४ भाग कमी होईपर्यंत) आटवा. दुधाची साय तळाला लागून नये म्हणून सतत ढवळत राहा.
- दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
- गॅस बंद करा आणि तयार दुधात सीताफळाचा गर आणि वेलची पावडर घाला. गुठळ्या होऊ नये म्हणून सर्व मिश्रण हळूवारपणे एकत्र करा.
- बासुंदी पूर्णपणे थंड होऊ द्या.
- थंडगार सीताफळ बासुंदी सुक्या मेव्याने सजवून सर्व्ह करा.
टीप
बासुंदीमध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून सीताफळाचा गर दुधात मिसळण्यापूर्वी मिश्रण थोडे थंड करणे महत्त्वाचे आहे.












