आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात. यावर्षी २ ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जात आहे. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही आहे. दसर्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून देण्यामागे अनेक पारंपरिक आणि ऐतिहासिक कारणं आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे. विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात? याबाबत जाणून घेऊया…
आपट्याच्या पानांचे धार्मिक महत्त्व
आपट्याची पाने ही सोन्याचे प्रतीक मानली जातात. या पानांची देवाणघेवाण करणे हे समृद्धीचे प्रतीक आहे. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे. आपट्याची पाने देऊन आपण एकमेकांना शुभ आणि समृद्धीची शुभेच्छा देतो. आपट्याच्या पानांमध्ये ईश्वरी तत्त्व आकर्षून घेण्याची क्षमता असते. ही पाने एकमेकांना दिल्याने तेजतत्त्व आणि सकारात्मक ऊर्जा एकमेकांना दिली जाते, ज्यामुळे वातावरणाची शुद्धी होते आणि वाईट शक्तींवर विजय मिळतो.

पौराणिक कथा
दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून देण्यामागे एक आख्यायिका आहे की, प्रभू श्रीरामांनी इंद्रदेवांना युद्धात हरवले होते. युद्ध जिंकल्यानंतर श्रीरामांना इंद्रदेवांकडून १४ कोटी सुवर्ण मुद्रा मिळाल्या. या सुवर्ण मुद्रा त्यांनी आपट्याच्या पानांवर ठेवल्या, त्यामुळे आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे दसऱ्याला आपट्याची पाने सोन्यासारखी पवित्र मानली जातात आणि एकमेकांना दिली जातात.
आपट्याची पाने कशी भेट द्यावीत?
दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून, नवीन कपडे घालून आपट्याची पाने तोडावीत. ती पाने मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना भेट देऊन ‘सोनं घ्या सोन्यासारखं राहा.. ! असं म्हणतं शुभेच्छा द्या. हे करताना हसतमुख राहावे आणि सकारात्मक ऊर्जा द्यावी.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











