MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Nose Size Bhavishya : नाकाचा आकार असा असेल तर आयुष्यभर राणी म्हणून राहाल, नाकावरुन ओळखा भविष्यातील मोठी गुपितं…

Written by:Smita Gangurde
Published:
ज्या प्रकारे तळहाताच्या रेषांवरुन भविष्याचा अंदाज घेतला जातो, त्याच प्रकारे शरीराच्या विविध अंगांवरुन भविष्याची भाकितं वर्तवली जातात.
Nose Size Bhavishya : नाकाचा आकार असा असेल तर आयुष्यभर राणी म्हणून राहाल, नाकावरुन ओळखा भविष्यातील मोठी गुपितं…

Nakavarun Bhavishya : हस्तरेखा शास्त्राप्रमाणे समुद्र शास्त्राचंही विशेष महत्त्व आहे. ज्या प्रकारे तळहाताच्या रेषांवरुन भविष्याचा अंदाज घेतला जातो, त्याच प्रकारे शरीराच्या विविध अंगांवरुन भविष्याची भाकितं वर्तवली जातात. समुद्र शास्त्रातून व्यक्तीच्या शरीराची रचना, अवयवांचा आकार यावरुन व्यक्तित्व आणि भविष्य सांगितलं जातं.

नाकावरुन कसं ओळखाल भविष्य...

असं नाक असलेल्या स्त्रिया मेहनती असतात…

ज्या महिलांचं नाक लहान असतं, अशा महिला समजूतदार असतात. आणि यांच्या स्वभावात लाजरेपणा असतो. याशिवाय लहान नाक असलेल्या स्त्रियांना आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि आर्थिक सुबत्ता मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अशा स्त्रिया मूळत: मेहनती असतात. दृढनिश्चय आणि मेहनतीतून त्या यशस्वी होतात.

जीवनात यशस्वी होतात या स्त्रिया…

ज्या महिलांचं नाक सुडौल असतं, आणि छिद्र एकसमान असतात, हे श्रेष्ठतेचे लक्षण मानले जाते. अशा महिला आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांना कधीही कशाचीही कमतरता जाणवत नाही. हस्तरेखा विज्ञानानुसार, अशा महिलांमध्ये अनेक चांगले गूण असतात. यांना अनेक क्षेत्रांचं चांगलं ज्ञान असतं. या ज्या क्षेत्रात जातात तेथे यश संपादन करतात.

या महिलांना मात्र संघर्ष अटळ…

ज्या महिलांचं नाक लांब असतं, त्यांना जगण्यात खूप संघर्ष करावा लागतो. सूखांसाठीही त्यांनी खूप झगडावं लागतं. तेव्हा कुठे यांना आनंदाचा थोडाबहुत अनुभव घेता येतो. मात्र लांब नाक असलेल्या महिलांना एकदा काही ठरवलं तर ते पूर्ण करतातच. गर्दीपेक्षा वेगळं काहीतरी करणं यांना आवडचं.

या महिला आयुष्यभर राणीसारखं जगतात…

ज्या महिलांचे नाक लांब असते त्या खूप भाग्यवान असतात. अशा महिला राणीसारखं जीवन जगतात आणि त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. या महिला करिअरमध्येही मोठा पल्ला गाठतात. ज्यामुळे त्यांना पैशांची कमतरता भासत नाही. नाकाच्या समोरील भाग लांब असणं म्हणजे ही महिला हसत-खेळत स्वभावाची आहे.

धनवान असतात या महिला..

ज्या महिलांचं नाक पुढे थोडं वाकलेले असतं, त्यांना आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यांचे आयुष्य संपत्तीने भरलेले असते. अशा परिस्थितीत, हे लोक जे काही मिळवू इच्छितात, ते अगदी सहजपणे साध्य करतात. आयुष्यात थोडेसे प्रयत्न केले तरी त्यांना पैसे मिळतात.

या महिला दुसऱ्यांच्या आनंदाचा करतात विचार…

ज्या महिलांचं नाक पोपटासारखं असतं, ते अत्यंत समजूतदार स्वभावाच्या असतात. त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं. या महिला आपल्या सोबत असणाऱ्यांच्या आनंदाचा विचार करतात आणि नात्यात संतुलन राखणं पसंत करतात. आयुष्यात काही अडचणी आल्या तर सांभाळून घेतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.