Ganesh Chaturthi Eating Tips : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीवर घराघरात आणि सार्वजनिक मंडळात गणेशाची स्थापना केली जाते. गणेश विघ्नहर्ता म्हणतो, त्याची पूजा केल्याने कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. शास्त्रानुसार, गणेशाच्या पूजनाशिवाय इतक कोणत्याही देवाची पूजा पूर्ण मानली जात नाही. कारण गणराय प्रथम पूजनीय आहे. या दिवशी चंद्र पाहिल्याने कलंक दोष लागतो. गणेशोत्सवाच्या चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशाची मनोभावे पूजा-अर्चा केली जाते.
अनंत चतुर्दशीला विसर्जन
शास्त्रामध्ये दिल्यानुसार, गणपती ज्ञान, विद्या आणि समृद्धीची देवता आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची स्थापना करीत दहा दिवस पूजा-अर्चा केली जाते आणि अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या काळात भक्त उपवास करतात. घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाच्या गाणी ऐकली जातात. या उत्सवात कुटुंब आणि समाज एकत्र येऊन बाप्पाची स्थापना करतो.

गणेशोत्सवात खाण्या-पिण्याचे नियम
गणेशोत्सव केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टिने खूप खास आहे. इतर सणांप्रमाणे या दिवसात खाण्या-पिण्याचे काही खास नियम असतात. हे नियम आयुर्वेद आणि ज्योतिषानुसार स्वीकारल्या जातात. या काळात आजारपणा उद्भवेल असे पदार्थ खाणे टाळले जातात. या दिवसात उपवास करणारे आणि न करणाऱ्यांसाठी नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे दहा दिवस या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.
काय खाल आणि काय टाळाल?
गणेशोत्सव काळात मांसाहारी आणि तामसी अन्न दूर ठेवा. या काळात सात्विक भोजन करायला हवं. जे लोक दहा दिवसांचं उपवास करतात, त्यांनाही एका वेळीस भोजन अवश्य करायला हवं, दहा दिवसांच्या पवित्र गणेशोत्सव काळात दिवसातून कमीत कमी एक वेळा दोडक्याची भाजी खायला हवी. तुम्हाला हवी त्या पद्धतीने दोडक्याती भाजी करू शकता. गणेशोत्सवात शाकाहारी पदार्थ म्हणून दोडक्याची भाजी खाणं अत्यंत शुभ मानलं जातं.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











