सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळत आहे. प्रत्येकाच्या घरात गणपतीची आरती, पूजा अनुभवायला मिळत आहे. गणपती बाप्पा साठी त्याच्या आवडीचे गोड पदार्थ बनवले जात आहेत…. गणपती बाप्पा हा कायम आपल्या घरी असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन हे करावंच लागतं. यंदा 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे…. या दिवशी अगदी थाटामाटात आणि धुमधडाक्यात गणपतीचे विसर्जन केले जाते. परंतु गणेश विसर्जनाचा (Ganesh Visarjan 2025) शुभ मुहूर्त काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?? चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो….
काय आहे शुभ मुहूर्त? Ganesh Visarjan 2025
मित्रांनो काहीजण आपल्या घरी दीड दिवसाचा गणपती बसवतात. काहीजण पाच दिवसांनी गणरायाचे विसर्जन करतात तर काहीजणांच्या घरात सात दिवसांचा गणपती असतो. परंतु हिंदू धर्मानुसार गणपतीचे खरे विसर्जन हे अनंत चतुर्थीलाच (Ganesh Visarjan 2025) असते. यंदा 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून या दिवशी गणेश विसर्जनाचे 3 वेगवेगळे शुभ मुहूर्त आहेत.
1) सकाळचा मुहूर्त – सकाळी ७:३६ ते ९:१०
2) दुपारचा मुहूर्त – दुपारी १२:१९ ते ५:०२
3) संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी ६:३७ ते रात्री ८:०२
असे करा गणेश विसर्जन-
गणपती विसर्जनाच्या तुमच्या घरातील गणेश मूर्तीची योग्य प्रकारे पूजा करा. पूजेमध्ये नारळ, शमी पत्र आणि गवत अर्पण करा. मूर्ती विसर्जनासाठी नेताना, घरात गणपतीला समर्पित तांदळाचे दाणे विखुरून टाका…. गणरायाची आरती म्हणा … आणि त्यानंतर पाण्यात गणपती बाप्पाची विसर्जन करा विसर्जनानंतर आपल्या सुख समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी हात जोडून गणेशाला प्रार्थना करा.
गणेश विसर्जना वेळी म्हणा हे मंत्र
1) यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
2) ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥ॐ महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥ॐ गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





