MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Ganesh Visarjan Muhurtha 2025 List : गणपती बाप्पाचं विसर्जन कधी कराल? विसर्जनाच्या मुहूर्ताची संपूर्ण यादी

Written by:Smita Gangurde
Published:
ज्यांनी तीन दिवसांसाठी गणपतीची स्थापना केली, ते आज 29 ऑगस्टला बाप्पाचं विसर्जन करतील. यानंतर पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन 31 ऑगस्ट, सात दिवसांच्या गणपतीचं विसर्जन २ सप्टेंबरला केलं जाईल.
Ganesh Visarjan Muhurtha 2025 List : गणपती बाप्पाचं विसर्जन कधी कराल? विसर्जनाच्या मुहूर्ताची संपूर्ण यादी

Ganesh Visarjan Muhurtha 2025 List : 27 ऑगस्ट गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात झाली असून 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू असेल. दहा दिवसांसाठी स्थापन केलेल्या बाप्पाची प्रतिमेचे 6 सप्टेंबरला गणेश भक्त जड अंतकरणाने विसर्जन करतील. अनेक ठिकाणी दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांसाठी गणेशाची स्थापना केली जाते. या दिवशी गणेशाची विधीवत विसर्जन केलं जातं. दीड दिवसांच्या गणपतीचे 28 ऑगस्ट रोजी विसर्जन झालं आहे.

ज्यांनी तीन दिवसांसाठी गणपतीची स्थापना केली, ते आज 29 ऑगस्टला बाप्पाचं विसर्जन करतील. यानंतर पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन 31 ऑगस्ट, सात दिवसांच्या गणपतीचं विसर्जन २ सप्टेंबरला केलं जाईल.

गणेशाच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे जाणून घ्या संपूर्ण यादी.

गणेश विसर्जन 2025 मुहूर्त यादी

तिसऱ्या दिवशी गणेश विसर्जन मुहूर्त – 29 ऑगस्ट 2025, शुक्रवार

सकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत) – सकाळी 05:58 ते सकाळी 10:46
सायंकाळचा मुहूर्त (चार) – संध्याकाळी 05:10 ते संध्याकाळी 06:46
दुपारचा मुहूर्त (शुभ) – दुपारी 12.22 ते दुपारी 1.58
रात्रीचा मुहूर्त (लाभ) – रात्री 09:34 ते रात्री 10:58
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चार) – 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12:22 ते 04:34 पर्यंत

गणेश विसर्जन मुहूर्त पाचव्या दिवशी – 31 ऑगस्ट 2025, रविवार

सकाळचा मुहूर्त (चार, लाभ, अमृत) – सकाळी 07:34 ते दुपारी 12:21
दुपारचा मुहूर्त (शुभ) – दुपारी 01.57 ते दुपारी 3.32
संध्याकाळचा मुहूर्त (शुभ, अमृत, चार) – संध्याकाळी 06:44 ते रात्री 10:57
दुपारचा मुहूर्त (लाभ) – 1 सप्टेंबर रोजी सकाळी 01:46 ते 03:10 पर्यंत
उषाकाल मुहूर्त (शुभ) – 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 04:35 ते 05:59 पर्यंत

गणेश विसर्जन सातव्या दिवशी- 2 सप्टेंबर 2025, मंगळवार

सकाळचा मुहूर्त (चार, लाभ, अमृत) – सकाळी 09:10 ते दुपारी 01:56 पर्यंत
दुपारचा मुहूर्त (शुभ) – दुपारी 03:31 ते संध्याकाळी 05:06
रात्रीचा मुहूर्त (लाभ) – रात्री 8.06 ते रात्री 9.31
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चार) – 3 सप्टेंबर रात्री 10:56 ते 03:10 AM

अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मुहूर्त

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता होते. यंदा अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबरला आहे. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी शुभ मुहूर्त आहे –

सकाळचा मुहूर्त (शुभ) – सकाळी 7.36 ते सकाळी 9.10
दुपारचा मुहूर्त (चार, लाभ, अमृत) – दुपारी 12.19 ते संध्याकाळी 5.02
संध्याकाळचा मुहूर्त (लाभ) – संध्याकाळी 06:37 ते रात्री 08:02
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चार) – 7 सप्टेंबर रोजी रात्री 9.28 ते रात्री 1.45
पहाटे मुहूर्त (लाभ) – 7 सप्टेंबर रोजी पहाटे 4.36 ते सकाळी 6.02

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)