Why Samll Ganpati Idol Is Kept: गणपती उत्सव भारतात सर्वात जास्त धुमधडाक्यात साजरा केला जातो. घर असो वा सार्वजनिक मंडळ बाप्पाची प्रतिमा स्थापन करतात. लोक नेहमी मोठी आणि सुंदर मूर्ती आणतात. मात्र मोठ्या मूर्तीसह एक लहान मूर्ती आणतात. ही केवळ एक परंपरा नाही, यामागे आस्था आणि धार्मिक महत्त्व आहे.
गणपती बाप्पा नेहमी सोबत राहील आणि त्याचा आशीर्वाद घरावर निरंतर राहील. या लेखात आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

मोठ्या गणपतीसह लहान मूर्ती स्थापन करण्याचं महत्त्व
धर्मग्रंथानुसार, उत्सवाच्या शेवटी मोठ्या मूर्तीचे विसर्जन पूर्ण विधींसह केले जाते. जेव्हा भाविक गणपतीला निरोप देतात तेव्हा लहान मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. तर ती घरात ठेवली जाते. ही छोटी मूर्ती बाप्पा केवळ काही दिवसांचा पाहुणा नसून घराचा कायमचा सदस्य आहे, याची खूण आहे. ही श्रद्धा भक्तांसाठी खूप खास असते. मोठ्या मूर्तीला जरी निरोप दिला तरी लहान मूर्तीच्या रुपात बाप्पाची उपस्थिती नेहमीच त्यांच्यासोबत राहते.
घरात राहते सकारात्मक ऊर्जा
लहान गणपती मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा राहते. मोठी मूर्ती विसर्जित केल्यानंतर जेव्हा भक्त लहान मूर्तीची पूजा करतात, त्यावेळी बाप्पा अद्यापही घरात असल्यासारखं वाटतं. या मूर्तीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि जीवनात आनंद राहतो. लहान मूर्ती ऊर्जेचं स्त्रोत असते. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आत्मविश्वास आणि शांती लाभते.
गणपती बाप्पासह लोक भावनात्मक जोडलेले असतात. मोठ्या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर भक्त भावुक होतात. अशात लहान मूर्ती मन संतुलित ठेवते. बाप्पा आपल्यासोबत असल्याची भावना राहते. त्यामुळे सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या मूर्तीसह लहान मूर्ती ठेवली जाते.