MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

Hanuman Mantra : दर शनिवारी म्हणा हनुमानाचे हे शक्तिशाली मंत्र; तुमच्या सर्व मनोकामना होतील पूर्ण

जो व्यक्ती हनुमानजींचे ध्यान करतो त्याच्यावर नेहमीच बजरंगबलीचा आशीर्वाद राहतो
Hanuman Mantra : दर शनिवारी म्हणा हनुमानाचे हे शक्तिशाली मंत्र; तुमच्या सर्व मनोकामना होतील पूर्ण

रामाचा भक्त हनुमानाला संकटमोचन हनुमानजी असेही म्हणतात. आपल्या हिंदू धर्मात शनिवार हा हनुमानाला समर्पित केला जातो…. दर शनिवारी भक्त हनुमानाच्या मंदिरात जातात आणि बजरंग बलीला प्रार्थना करतात. आपल्या मनातील सर्व इच्छा आणि मनोकामना हनुमानाच्या समोर बोलून दाखवतात. शनिवारी हनुमानाची पूजा आणि उपवास केल्याने बजरंगबली आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. आणि सर्व संकटातून सहिसलामत बाहेर काढतो अस म्हटले जाते. आपल्या भारतात असे अनेक मारुती आहेत जे नवसाला सुद्धा पावतात. या सर्व पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला हनुमानाचे असे काही मंत्र सांगणार आहोत (Hanuman Mantra)ज्याचा जप केल्याने तुमच्यावरील सर्व संकटे दूर होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

कोणकोणत्या मंत्रांचा जप कराल – (Hanuman Mantra)

शत्रूचा नाश करण्यासाठी

ओम हनुमते रुद्रटकयं हम फट.

यश आणि प्रगतीसाठी

‘ओम हन हनुमते नमः।’

इच्छित परिणाम मिळविण्यासाठी

‘ओम नमो भगवते हनुमते नमः।’

हनुमान मूल मंत्र

ओम ह्रीं हनुमते श्री रामदूताय नमः।

रुद्र हनुमान मंत्र

ॐ नमो हनुमते रुद्रावताराय, सर्व शत्रूंचा नाश करणारा.
सर्व रोगांचा नाश होतो, रामदूताय स्वाहा, सर्व जिंकणारे.

हनुमान गायत्री मंत्र

ओम आंजनेय्या विद्महे वायुपुत्रया धीमही ।
तन्नो हनुमत प्रचोदयात् ।

पंचमुखी हनुमान मंत्र

ॐ नमो हनुमते रुद्रावताराय, सर्व शत्रूंचा नाश करणारा, सर्व रोगांचा पराभव करणारा, सर्व रोगांचा पराभव करणारा, रामदूताय स्वाहा.

ह हनुमंते नमः”

ओम नमो हनुमते अवेशाय आवेषाय स्वाहा

ॐ हुं हनुमते रुद्रात्काय हुं फत

जय जय बजरंगबली –

असे म्हटले जाते की जर एखादी व्यक्ती दुःखी असेल तर त्याने हनुमानजींची (Hanuman Mantra) पूजा करावी. बजरंगबलीची पूजा केल्याने आणि मंत्र म्हटल्याने त्या व्यक्तीचे दुःख नष्ट होते. जो व्यक्ती हनुमानजींचे ध्यान करतो त्याच्यावर नेहमीच बजरंगबलीचा आशीर्वाद राहतो. तसेच, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि समस्या संपतात. दर शनिवारी मारुती स्त्रोत आणि हनुमान चालिसा म्हटली तर अधिक चांगले…..

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.