काही नाही रक्ताची असतात, तर काही नाती जिव्हाळ्याची. यातील एक नातं म्हणजे मैत्री. मैत्री हे नातंच मूळात निस्सिम असतं. यात कोणतीही अपेक्षा नसते. सुख-दुख:ची देवाणघेवाण असते. जात-धर्म याचा कोणताच अडथळा नसतो. एकदा का समोरच्याशी व्हेवलेंथ जुळली की तो आपला एकदम खास होऊन जातो. (Happy Friendship Day 2025 Wishes And Quotes)
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. तसं पाहता मित्राला थँक्यू म्हणायचं नसतं. मात्र मैत्री दिनाच्या निमित्ताने तुमच्यासाठी तो किती खास आहे हे तर सांगायलाच हवं. या मैत्री दिनानिमित्ताने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या याराला हे खास संदेश पाठवा.
मित्राला पाठवा खास संदेश…maitri dinachya hardik shubhechha
1 तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा
मुखवट्याच्या या जगामध्ये खात्रीचा विसावा
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
2 अडचणीत कायम सोबत असतात मित्र
दुःख वाटून घेतात मित्र
रक्ताचं नात नसतानाही
आयुष्यभर साथ देतात मित्र
हॅपी फ्रेंडशिप डे !!!
3 मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री म्हणजे प्रेम, मैत्री म्हणजे मस्ती, आणि मैत्री म्हणजे तू..
हॅपी फ्रेंडशिप डे यारा !!!
4 जीवनात खूप मित्र मैत्रिणी होतात पण एक अशी पागल मैत्रीण असते जे आपला जीव असते आपली Bestie …
हॅपी फ्रेंडशिप डे Bestie…
5 कधी शब्दांपेक्षा शांततेत प्रेम दिसते तर कधी हास्याच्या मागे दुःख लपलेले असते पण खरी मैत्री तीच असते जी अशा प्रत्येक क्षणी हसवते आणि साथ देते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

6 मैत्री म्हणजे केवळ एक नाते नव्हे ती आहे एक भावना जी मनामनात जुळलेली असते तुझ्या माझ्या मैत्रीच्या सुंदर नात्याला सलाम
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Friendship Day 2025)
7 तू सोबत असलास की आयुष्याची वाट सोपी वाटते प्रत्येक दुःख, संकट तू हसत दूर करण्यास मदत केलीस त्यासाठी मनापासून धन्यवाद
Love You दोस्ता…
8 तुझ्यासारखी मैत्रिण म्हणजे देवाचे वरदान जेव्हा सर्व जग दूर जाते तेव्हा तू जवळ उभी राहतेस
कायम सोबत राहा, मैत्री दिनाच्या शुभेच्छा…
9 जगातली बहुतांश सर्व नाती स्वार्थासाठी असतात पण एकच नातं असं आहे जे मनापासून जपलं जातं ते म्हणजे मैत्रीचे नाते तुझ्यासारखा मित्र मिळाल्याने आयुष्य सुंदर वाटतंय
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
10 कोण म्हणतं, मैत्री बरबाद करते, जर निभावणारे कट्टर असतील ना.. तर सारी दुनिया सलाम करते..
हॅपी फ्रेंडशिप डे!!!





