Ganesh Chaturthi 2025 Wishes: ‘तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा’; गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

पुढचे दहा दिवस हे आनंदाचे आणि उत्साहाचे असतील. तुमच्या आनंदात इतरांनाही सामील करून घ्या. आपले मित्र-मैत्रिणी आणि आप्टेष्टांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.

Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पा आता घरी येऊन विराजमान झाला आहे. उद्या त्याची प्राणप्रतिष्ठा होईल. त्यामुळे घरात धावपळ सुरू आहे. बाप्पा घरात येतो आणि घरातील सर्व विघ्न दूर होतात असा विश्वास ठेवून लाखो-कोट्यवधि लोक बाप्पाची मनोभावे पूजा करतात. २७ ऑगस्ट गणेश चतुर्थीला बाप्पा येतात आणि सर्वांमध्ये उत्साह संचारतो. आता पुढचे दहा दिवस हे आनंदाचे आणि उत्साहाचे असतील. तुमच्या आनंदात इतरांनाही सामील करून घ्या. आपले मित्र-मैत्रिणी आणि आप्टेष्टांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!| Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi| Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi

१ गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

गणेशोत्सवाच्या लाखभर शुभेच्छा

२ नमन तुजला गणपतये । प्रत्यक्ष तत्त्व तूच अससि ।
जगत कर्ता तूज अससि । जगत धर्ता तूच अससि ।

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

३ संकटनाशका तुज नमस्कार । शिवसुता तुज नमस्कार ।
सर्व भक्तांना वर देणाऱ्या। वरदमुर्तये तुज नमस्कार ।

बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करो, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

४ मोरया मोरया, मी बाळ तान्हे
सेवा तुझी ती करू काय जाणे?
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

गणपती बाप्पा मोरया..

Ganesh Chaturthi 2025 Wishes: 'तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा'; गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

५ बुद्धीचे दाता, विघ्नहर्ता श्रीगणेशा
तुमचे जीवन आनंदमय करो
मोदकासारखी गोडी
दुर्व्यासारखी शुद्धता तुमच्या आयुष्यात असो
गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

६ गणेशोत्सव ही श्रद्धा आणि भक्तीची गंगा
तिच्या प्रवाहात मन न्हाऊन निघो
तुमचे जीवनही भक्तिभावाने उजळून जावो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

७ विघ्नहर्त्याचा आशीर्वाद घेऊन
सर्व विघ्न टाळा आणि
सदैव यशस्वी व्हा हीच श्री चरणी प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

८ गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात
प्रेम, शांतीचा वर्षाव करो
सर्वांचे मन जिंकणाऱ्या या उत्सवात
तुमचे मनही आनंदित होवो!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

Ganesh Chaturthi 2025 Wishes: 'तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा'; गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

९ गणराया तुझ्या येण्याने सुख, समृद्धी, शांती, आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीवार्द राहू दे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

१० वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

११ मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला मखर नटूनी तयार झाले, वाजत-गाजत बाप्पा आले गुलाल फुले, अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे गणेश चतुर्थीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!

१२ उंदरावर बैसोनी आली गणेशाची स्वारी त्याच्या येण्याने अवघी सृष्टी चैतन्यमय झाली! भक्त मंडळी फुलांचा वर्षाव करती, बाप्पाच्या येण्याने आनंदाला आली भरती!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

१३ तुच सुखकर्ता तुच दु:ख हर्ता अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा


About Author

Smita Gangurde

Other Latest News