Hartalika Tritiya 2025 : हरितालिका व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला ठेवलं जातं. हे व्रत सौभाग्यवती आणि अविवाहित महिलांसाठी शुभ मानलं जातं. पौराणिक कथांनुसार, माता पार्वतीने कठोर तपस्या केल्यानंतर तिला भगवान शंकर पतीरुपात भेटले होते. (Haritalika vrat 2025)
तेव्हापासून या व्रताची सुरुवात झाली आणि ही परंपरा अद्यापही सुरू आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी विधीनुसार व्रत आणि पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्य लाभतं. विवाहित महिला हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबात सुख-शांती राहावी यासाठी करतात. शास्त्रामध्ये या दिवशी व्रत करण्याचे योग्य नियम सांगण्यात आले आहेत. ज्याचं पालन करणं धार्मिक दृष्टिकानोतून आवश्यक आहे.
हरितालिकेच्या व्रतादिवशी काय कराल? what should do on Haritalika
– महिलांनी या दिवशी लवकर उठावे. सुर्योदयापूर्वी आंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करावा. यावेळी शिव-पार्वतीचं ध्यान करावं.
– या दिवशी वाळूने शंकराची पिंड बनवावी. त्यावर बेलपत्र, धोतरास अक्षता, रोली, कंकू आदी गोष्टी अर्पण कराव्यात.
– हरितालिका तृतीया व्रताची कथा ऐकावी आणि मोठ्याने वाचावी. कथा ऐकूनही व्रत पूर्ण झाल्याचं मानलं जातं.
– सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी श्रृंगार करावा. यामध्ये बांगड्या घालणे, टिकली, मेंदी, सिंदूर, दागिने घालावेत हे शुभ आणि मंगलकारी मानले जातात.
– कुमारी मुलींनी हे व्रत केल्याने त्यांना चांगला पती मिळतो अशी मान्यता आहे.
काय करू नये?
– हे व्रत निर्जल ठेवाव. दिवसभर महिलांना अन्न किंवा पाणी घेऊ नये.
– व्रताच्या दिवशी महिलांनी चिडू नये, वाईट बोलू नये.
– व्रताच्या दिवशी खोटं बोलणं, एखाद्याला त्रास देणं वर्जित आहे.
– सायंकाळी शिव-पार्वतीची पूजा, कथा ऐकल्यानंतर व्रताचं समापन करावं.
– व्रताच्या दिवशी नकारात्मक विचार, चुकीचे काम, अपवित्र कार्य करू नये.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





