MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Hartalika Tritiya Shubhechha in Marathi : शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान; हरितालिकेच्या मन:पूर्वक शुभेच्छा

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
यंदा २६ ऑगस्ट रोजी देशभरात हरतालिका तृतीया साजरा केली जाणार आहे. दरम्यान आपल्या आप्तजनांना हरितालिकेच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका
Hartalika Tritiya Shubhechha in Marathi : शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान; हरितालिकेच्या मन:पूर्वक शुभेच्छा

Hartalika Tritiya Shubhechha in Marathi : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी देशभरात हरितालिकेचं व्रत केलं जातं. काही जण याला हरितालिका तृतीया तर काही राज्यांमध्ये याला हरितालिका तीज म्हटलं जातं. देशभरातील महिला वर्ग मनोभावे हरितालिकेचं व्रत करतात. हे व्रत भगवान शंकर आणि पार्वती मातेसाठी केलं जातं.

विशेषत: कुमारी कन्या किंवा लग्नासाठी इच्छुक तरुणी हे व्रत सहसा चुकवत नाही. पौराणिक मान्यतेनुसार, लग्न झालेल्या महिला आपलं सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी तर कुमारी चांगला नवरा मिळावा म्हणून करतात. हे व्रत केल्यानं मनासारखा नवरा मिळतो असा विश्वास आहे. यंदा २६ ऑगस्ट रोजी देशभरात हरतालिका तृतीया साजरा केली जाणार आहे. दरम्यान आपल्या आप्तजनांना हरितालिकेच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका

हरितालिकेच्या शुभेच्छा…l Hartalika Tritiya Shubhechha in Marathi

1 सौभाग्याचे देणं आहे हरतालिका, मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा, हीच शंकरा चरणी इच्छा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा!

2 माता उमाच्या थाळी जसा शिवाचा पिंजर उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनाजोगता वर, हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा

3 आई पार्वती आणि शंकर देवाचा आशीर्वाद
सुख, शांती, समृद्धी, ख़ुशी आणि चांगले स्वास्थ्य
तुमच्या जीवनात येवो,
अशी देवा जवळ प्रार्थना.
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

4 हरतालिका हा सण,
स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम
आणि त्याग दर्शविणारा आहे.
आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
भगवान शिवप्रमाणे एक शक्तिशाली,
प्रेमळ पती लाभो हि आमची सदिच्छा.
हरतालिकाच्या हार्दिक शुभेच्छा.

5 शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरितालिका तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!

6 आला रे आला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!

7 तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो,
समृद्धी घेऊन आली हरतालिका,
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!

8 संकल्प शक्तीचे प्रतीक
अखंड सौभाग्याची प्रार्थना
हरितालिका सणानिमित्त पूर्ण
होवो तुमच्या मनोकामना
हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!

9 लाभावी पतीची साथ, व्हावी सुखी संसाराची सुरुवात, हरितालिकेच्या शुभेच्छा

10 तुम्हा आम्हा सगळ्यांचा जीवनात यावा शंकरासमान पती, त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी
हरतालिकेचा आनंद मनी दाटला, हर्ष आनंदोत्सवाचा क्षण हा आला, हरतालिकेच्या शुभेच्छा!