गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी देशभरात हरितालिकेचं व्रत केलं जातं. काही जण याला हरितालिका तृतीया तर काही राज्यांमध्ये याला हरितालिका तीज म्हटलं जातं. देशभरातील महिला वर्ग मनोभावे हरितालिकेचं व्रत करतात. हे व्रत भगवान शंकर आणि पार्वती मातेसाठी केलं जातं.
विशेषत: कुमारी कन्या किंवा लग्नासाठी इच्छुक तरुणी हे व्रत सहसा चुकवत नाही. पौराणिक मान्यतेनुसार, लग्न झालेल्या महिला आपलं सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी तर कुमारी चांगला नवरा मिळावा म्हणून करतात. हे व्रत केल्यानं मनासारखा नवरा मिळतो असा विश्वास आहे. यंदा २६ ऑगस्ट रोजी देशभरात हरतालिका तृतीया साजरा केली जाणार आहे.
जाणून घेऊया हरितालिका व्रताचं महत्त्व, पूजा-विधी
हरितालिकेच्या व्रतासाठी लागणारं साहित्य…
रेती
बेल
शमी पत्र
आंब्याची पानं
पांढरे फूल
वस्त्र
फूलं
बांगड्या
काजळ
कुंकू
श्रीफळ
कलश
दूध
दही
मध
साखर
कापूर
तेल
तूप
चौरंग
रांगोळी
तसराळ
आसन
निरांजन
ताम्हळ
पळी
पंचपात्र
तांदूळ
निरांजन
शंख
घंटा
हळद-कुंकू
बु्क्का
चंदन
अक्षता
उदबत्ती
कापूर
तूप-तेलाच्या वाती
विड्याची पानं
सुपारी
नारळ
फळे
खडीसाखर
गूळखोबकं
पंचामृत
कोरे वस्त्र
कापसाचे वस्त्र
फणी
आरसा
कशी कराल पूजा?
काळ्या ओल्या माती वा रेतीपासून शिव आणि गणेशाची मूर्ती तयार केला. शंकराची पिंड तयार केली तरी चालेल. ही मूर्ती फुलांनी सजवा. चौरंग घ्या, त्यावर पिवळे कापड घाला. त्यावर वाळूचे शिवलिंग ठेवा. चौरंगाच्या उजव्या बाजूला तांदळापासून अष्टकमल तयार करा, त्यावर कलश ठेवा. कलशावर स्वस्तिक काढा. कलशात पाणी भरा, त्यात सुपारी, नाणे, हळद झाला. पिंडाला अभिषेक करा. देवी पार्वतीला साहित्यात दिलेल्या सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. या दिवशी १६ श्रृंगाराचे विशेष महत्त्व आहे.
घरात माती नसेल तर बाजारातून गौरी-पार्वतीची मूर्ती, शिवलिंगाची मूर्ती आणून त्याची पूजा करता येऊ शकेल.
हरितालिका तृतीया शुभ मुहूर्त (Hartalika Teej 2025 shubh muhurt)
हरितालिका तृतीयाचं व्रत २६ ऑगस्ट रोजी आहे. पूजेचा मुहूर्त सकाळी ५.५६ मिनिटांपासून सकाळी ८.३१ मिनिटांपर्यंत असेल. म्हणजे पूजेसाठी तुम्हाला २.३५ मिनिटं मिळतील





