Hasta Resha : हिंदू धर्मात भविष्य सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत. यातीलच एक म्हणजे हस्तरेषाशास्त्र. म्हणजेच काय तर तळहातावरील रेषा पाहून, व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही शिकता येते. काही लोकांच्या तळहातावर काही विशिष्ट रेषा असतात, ज्यामध्ये तुम्ही M अक्षर अनेकदा बघितलं असेल. हस्तरेषाकारांच्या मते ज्यांच्या तळहातावर M चिन्ह असते ते खूप भाग्यवान असतात.
यशस्वी लीडर
ज्यांच्या तळहातावर स्पष्टपणे दिसणारे M चिन्ह असते त्यांची मानसिक स्थिती खूप मजबूत असते. असे लोक महान आणि यशस्वी लीडर बनतात. त्यांच्याकडे असाधारण नेतृत्व क्षमता असते. ते राजकारणातही उच्च पदांवर जातात आणि दीर्घकाळ या पदांवर राहतात. (Hasta Resha)

कल्पनाशक्ती आश्चर्यकारक
हातावर M अक्षर असलेल्या लोकांमध्ये चांगली कल्पनाशक्ती असते. याचा अर्थ त्यांच्याकडे विचार करण्याची आणि समजून घेण्याची उल्लेखनीय क्षमता असते, ज्यामुळे ते कला क्षेत्रात प्रसिद्ध होऊ शकतात. असे लोक प्रसिद्ध चित्रकार, संगीतकार किंवा गीतकार देखील बनू शकतात.
नाव आणि प्रसिद्धी मिळते
तळहातावर M अक्षर असलेल्या व्यक्तीला नाव आणि प्रसिद्धी दोन्ही असते, म्हणजेच ते खूप प्रसिद्ध असतात आणि त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. त्यांचे बोलण्याचे कौशल्य आणि कला पैसे आकर्षित करते. ते हे पैसे देखील खर्च करतात, म्हणजेच ते खर्चिक असतात.
प्रेमविवाह होण्याची शक्यता
ज्यांच्या तळहातावर M अक्षर आहे त्यांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त असते. ते ज्याच्यावर मनापासून प्रेम करतात त्याच व्यक्तीशी लग्न करतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते. त्यांचा जोडीदार देखील खूप सुंदर आणि बुद्धिमान असतो.
आव्हाने स्वीकारतात
त्यांच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा आव्हाने येतात तेव्हा तेत्यांना धैर्याने तोंड देतात. ते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान स्वीकारतात आणि त्यावर मात करेपर्यंत शांत बसत नाहीत.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.).











