सर्वांना पैसे हवे असतात. पगार कितीही वाढला तरी पैसे अपुरेच वाटत असतात. पगार वाढतो तशा आपल्या इच्छा-आकांक्षाही वाढतात. ज्योतिषशास्त्रानुसार, आयुष्यात काही छोटे मोठे बदल केले तरी तुमचं नशीब उजळून निघू शकतं.
करोडपती कसे व्हाल?
१ जर एखाद्या व्यक्तीला करोडपती व्हायचं असेल तर त्याने काही बदल करणे आवश्यक आहे. ज्योतिष आचार्य संतोष कुमार चौबे यांनी यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महिलांना सन्मान करा.. त्यांनी सांगितलं की, तुम्ही कमवत असलेल्या रकमेचा दहा टक्के भाग आपल्या पत्नीला पॉकेट मनीच्या स्वरुपात देण्यास सुरुवात करा. माझे पैसे जात आहेत, याचा विचार करू नका. तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करीत आहात, असा विचार करा. जेव्हा पत्नी मनातून आनंदी असते, तेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृता राहते. तुम्हाला जर असं वाटत असेल की लक्ष्मीसमोर दररोज दिवा लावून किंवा पूजाअर्चा करून ती प्रसन्न होईल. तर असं नाहीये. तुम्ही तुमच्या घरातील महिलांना प्रसन्न करून लक्ष्मीला प्रसन्न करू शकता.
२ आता दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही कोणताही निर्णय घेता तेव्हा एकदा तुमच्या पत्नीचा सल्ला घ्या. अशा परिस्थितीत पत्नीला आदर मिळत असल्याचं तिला वाटतं आणि ती आतून आनंदी राहते. देवी लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल.
चुकूनही पत्नीला दुखवू नका…
३ चुकूनही आपल्या पत्नीला शिवीगाळ करू नका किंवा मारहाण करू नका. नाहीतर तुम्ही कष्ट करून थकून जाल आणि पैसा येणार नाही. किंवा पैसा आला तरी तो टिकणार नाही. चुकीच्या मार्गाने निघून जाईल.
४ याशिवाय घरातील स्वयंपाक घरातील डबे कायम भरलेले असावेत. नेहमी चांगला स्टॉक करून ठेवा. तिला बोलण्याची संधी देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला वाट पाहायला लावू नका. तुमचं मासिक उत्पन्न कमी असेल तरी स्वयंपाक घरात फार कंजूषपणा करू नका.
५ याशिवाय शुक्रवारी आपल्या पत्नीला पांढऱ्या रंगाची मिठाई खाऊ घाला. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. शुक्र ग्रह धन, वैभव, लग्जरी, पैसे या सर्व गोष्टींचा कारक असतो. शुक्र मजबूत असेल तर या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे मिळू शकतील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





