यशोदा माता श्रीकृष्णाचे बाळ रुपावर अनेक साज चढवायची त्यापैकी एक त्यांच्या मुकुटावर असणारा मोरपंख. लहानपणापासून त्यांच्या माथ्यावर मोराचे पीस पाहायला मिळायचे. श्रीकृष्णाच्या मुकूटावर मोरपंख का असते? यामागे अनेक विविध कथा आहेत. अनेकांना यामागे नेमके तथ्य काय ते जाणून घ्यावे वाटते. श्रीकृष्णाची पूजा केली जाते. श्रीकृष्णाच्या संबंधित अनेक कथा आणि श्रद्धा आहेत.
श्रीकृष्णाच्या मुकूटावर मोरपिस का असते?
श्रीकृष्णाची पूजा केली जाते. श्रीकृष्णाच्या संबंधित अनेक कथा आणि श्रद्धा आहेत. यशोदा माता श्रीकृष्णाचे बाळ रुपावर अनेक साज चढवायची त्यापैकी एक त्यांच्या मुकुटावर असणारा मोरपंख. लहानपणापासून त्यांच्या माथ्यावर मोराचे पीस पाहायला मिळायचे. श्रीकृष्णाच्या मुकूटावर मोरपंख का असते ? यामागे अनेक विविध कथा आहेत. धार्मिक मान्यतेनुसार एकदा राधा श्रीकृष्णाच्या बासरीवर नाचत असताना तिच्या सोबत मोरही नाचू लागले. तेव्हा त्यातील एक मोरपंख खाली पडले. तेव्हा श्रीकृष्णाने ते मुकूटावर सजवले. मोराच्या पिसांना राधेच्या प्रेमाचे प्रतीक मानत होते. म्हणूनच श्रीकृष्णाच्या माथ्यावर मोरपिस पाहायला मिळते.
शत्रुला विशेष स्थान देण्याचे प्रतीक
श्रीकृष्णाने कधीही आपल्या मित्र आणि शत्रूंची तुलना केली नाही. श्रीकृष्णाचा भाऊ बलराम हा शेषनागाचा अवतार होता. मोर आणि साप हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. परंतु, श्रीकृष्णाच्या मुकूटात असणारे मोरपीस असे सांगतो की, ते आपल्या शत्रूंनाही विशेष महत्त्व देतात. से म्हटले जाते की मोर आणि साप यांच्यात वैर आहे. याच कारणांमुळे कालसर्प योगामध्ये मोराची पिसे सोबत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. श्रीकृष्णालाही कालसर्प दोष होता असे मानले जाते. या दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोराची पिसे श्रीकृष्ण नेहमी सोबत ठेवायचे.
श्रीकृष्णाने मोराचे पिस धारण केले त्यामागे लोकप्रिय कथा आहे. मोर हा एकमेव पक्षी आहे जो आयुष्यभर ब्रह्मचारी राहातो. नर मोराचे अश्रू पिऊन मादी मोराची गर्भधारणा होते असे म्हटले जाते. त्यामुळे देखील श्रीकृष्ण आपल्या कपाळावर पवित्र पक्ष्याचे मोरपीस लावतात.





