कोजागिरी पौर्णिमा म्हणजे हिंदू धर्मातील एक विशेष सण आहे, जो शरद ऋतूच्या मध्यात साजरा केला जातो. या रात्री चंद्र आपल्या पूर्ण तेजाने आकाशात चमकत असतो आणि याच वेळी विशेषतः मसाला दूध पिण्याची परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात आनंद आणि चैतन्य घेऊन येते. चंद्राच्या मंद प्रकाशात, आप्तजनांसोबत गप्पा कारण, मजामस्ती करणं, नाच गाणं करत आनंद साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुधासोबत करा चविष्ट मेन्यू…कोजागरी होईल खास
साहित्य
- १ कप मुगाची डाळ (हिरवी किंवा पिवळी)
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा किसलेले आले-लसूण
- हिंग, हळद, मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
कृती
- मुगाची डाळ ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा.
- भिजवलेली डाळ पाणी काढून टाका आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. काही लोक साल न काढता डाळ वापरतात, ज्यामुळे वडे अधिक पौष्टिक होतात.
- वाटलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, हिंग, हळद आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
- मिश्रण थोडं थोडं घेऊन त्याचे गोल किंवा चपटे वडे बनवा.
- कढईत तेल गरम करा आणि वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
कोजागिरी पौर्णिमेसाठी खास टिप्स
- तुम्ही चवीसाठी बारीक किसलेले आले आणि लसूण घालू शकता, ज्यामुळे वड्याची चव आणखी वाढते.
- गरमागरम वडे पुदिन्याच्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
- कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूधा सोबत हे खमंग वडे खाण्याचा आनंद घ्या.





