Kojagiri Purnima 2025 Rashi Bhavishya : कोजागिरी पौर्णिमेनंतर या राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार

Asavari Khedekar Burumbadkar

दसऱ्यानंतर आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात तापवलेले दूध ग्रहण करण्याची प्रथा आहे. हिंदू पंचागानुसार, यंदा  आश्विन महिन्यातील पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:16 वाजेपर्यंत असणार आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरणं संपूर्ण जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्राच्या (Kojagiri Purnima 2025 Rashi Bhavishya) दृष्टिकोनातूनही हा दिवस खूप लाभदायी मानला जाईल. पंचांगानुसार, पौर्णिमेच्या दिवशी दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांनी चंद्र शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींना पाहायला मिळेल.

1) मेष रास

मेष राशीच्या व्यक्तींसाठी कोजागिरीला होणारे चंद्राचे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. जर तुमची काही कामे अनेक दिवसापासून रखडलेले असतील तर ती 6 ऑक्टोबर नंतर पूर्ण होऊ शकतात. नोकरदार वर्गासाठी कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. साहजिकच तुमचा पगारवाढ सुद्धा 6 ऑक्टोबर नंतरच होऊ शकतो. तुमच्यावर कसलं कर्ज असेल तर ते सुद्धा फिटु शकते. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल

2) तूळ Kojagiri Purnima 2025 Rashi Bhavishya

तूळ राशीच्या लोकांसाठी या दिवशी नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण अत्यंत सकारात्मक राहील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. मित्र आणि पै पाहुण्यांकडून मदतीची शक्यता आहे. व्यावसायिकांना 6 ऑक्टोबर नंतर मोठा फायदा होऊ शकतो.

3) सिंह रास

सिंह राशीच्या व्यक्तींना कोजागिरीचा दिवस (Kojagiri Purnima 2025 Rashi Bhavishya) खूप शुभ असेल. तुम्ही जर कुठे गुंतवणूक करण्याच्या विचारात असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल आणि कौतुक केले जाईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील, समाजात मान सन्मान आणि आदर मिळेल. लग्नाच्या विचारात असलेल्या लोकांना अनुकूल काळ असेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या