दरवर्षी दिवाळीच्या अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा पाळली जाते. यंदाचे लक्ष्मी पूजन उद्या असून सर्वत्र पूजेची तयारी सुरू आहे. लक्ष्मी पूजनाला तुम्ही तुमच्या प्रियजनांना काही खास शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास शुभेच्छा (Laxmi Pujan Wishes) संदेश घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊयात.
लक्ष्मी पूजनाचे खास संदेश – Laxmi Pujan Wishes
घरात लक्ष्मीचा निवास, अंगणी दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, दिवाळी अशी खास, शुभ दिपावली

रांगोळीच्या रंगात रंग संपत्तीचा लाभ होवो अनंत लक्ष्मीपूजनाचा हा पवित्र दिवस घेऊन येवो यश आणि संतोषलक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या घरी होवो धनाची बरसात. होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास, संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास शुभ दीपावली, शुभ लक्ष्मीपूजन! Laxmi Pujan Wishes
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती… लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, लक्ष्मीपूजन शुभेच्छा…!
लक्ष्मीमातेचे वाहन, घेऊन येते सौख्यसंपत्ती, आरोग्य, आणि नात्यांचे बळ दिवाळीचा प्रत्येक क्षण होवो खास शुभेच्छा तुमच्या संपूर्ण परिवारास!लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीमातेचं घरामध्ये आगमन होवोघरात सुख-समृद्धी नांदोदिव्यांचा लखलखाट साजरा होवोतुमचे आयुष्य उजळू दे दिव्यांसमानलक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीपूजन करण्यासाठी अडीच तासाचा वेळ :
अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता तिथी संपणार आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं योग्य आहे. यादिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी 6.10 वाजेपासून ते रात्री 8.40 वाजेदरम्यान लक्ष्मीपूजन करू शकता. यंदा लक्ष्मीपूजन करण्यासाठी जवळपास अडीच तासाचा वेळ आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











