चंद्रग्रहण आणि सुर्यग्रहणाला भारतात अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व दिले जाते. यामध्ये 7 सप्टेंबरला पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे. 2025 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 वाजता सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1.26 पर्यंत असणार आहे. तर पूर्ण चंद्रग्रहण रात्री 11.42 ते 12.47 पर्यंत असणार आहे. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत असतो. पूर्ण ग्रहणादरम्यान, चंद्र लाल होईल आणि हे दृश्य सुमारे 65 मिनिटे दिसणार आहे.
पूर्ण चंद्रग्रहणाची विशेषता नेमकी काय?
पूर्ण चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली पूर्णपणे चंद्रावर पडते. या वेळी चंद्र काळसर लालसर दिसतो, ज्याला “ब्लड मून” असेही म्हणतात. ही घटना खूप दुर्मिळ असते आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. ग्रहणाच्या वेळी खगोलशास्त्रज्ञ विविध संशोधन करतात. भारतीय संस्कृतीत चंद्रग्रहणाला धार्मिक महत्त्वही आहे. लोक या काळात उपवास, जप आणि प्रार्थना करतात. तसेच ग्रहण संपल्यावर स्नान व दान करण्याची परंपरा आहे. पूर्ण चंद्रग्रहण ही निसर्गातील अद्भुत दृश्य मानले जाते.
भारतातील कोणत्या शहरातून ग्रहण दिसणार?
हवामान स्वच्छ असल्यास भारतातील या 15 शहरांमध्ये चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे. भारतात हे चंद्रग्रहण दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे, लखनौ, जयपूर, चंदीगड, अहमदाबाद, गुवाहाटी, पटना, भोपाळ आणि भुवनेश्वर. कोलकाता, गुवाहाटी सारख्या पूर्व भारतात चंद्रोदय लवकर झाल्यामुळे ग्रहणाची सुरुवात अधिक स्पष्टपणे पाहता येते. त्याच वेळी, मुंबई आणि अहमदाबाद सारख्या पश्चिम भारतात ग्रहण पूर्णपणे दिसेल, परंतु चंद्रोदयाची वेळ थोडी उशिरा असेल. हिंदू मान्यतेनुसार, सूतक काळ ग्रहणाच्या वेळेच्या 9 तास आधी सुरू होईल.
चंद्रग्रहणाबद्दल लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे की हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पहावे की नाही? ग्रहण असं उघड्या डोळ्यांनी पाहणे अशुभ मानले जाते पण नक्की यामागे काय सत्य आहे जाणून घेऊयात. विज्ञानानुसार चंद्रग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते. तसेच उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहण्यात काहीही नुकसान नाही तसेच ते सूर्यग्रहणापेक्षा वेगळे असते. चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही चष्म्याची किंवा संरक्षक फिल्टरची आवश्यकता नसते आणि चंद्र उघड्या डोळ्यांनी पाहता येतो.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.





