यंदा दिवाळीत 100 वर्षांनी महालक्ष्मी राजयोग; ‘या’ तीन राशींचे नशीब बदलणार? बक्कळ धन येणार?

आगामी दिवाळी सणात काही राशींसाठी महालक्ष्मी राजयोग चालून येत आहे. जवळपास 100 वर्षांनी हा योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. सविस्तर जाणून घेऊ...

महालक्ष्मी राजयोग संकल्पना ही ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाची व लाभदायक संकल्पना मानली जाते. या योगामुळे व्यक्तीच्या आयुष्यात धन, ऐश्वर्य, कीर्ती, मान-सन्मान व सुखसमृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. महालक्ष्मी राजयोग तेव्हा तयार होतो, जेव्हा जन्मकुंडलीतील लक्ष्मीस्थान म्हणजे दुसरे घर, धनस्थान म्हणजे अकरावे घर आणि कर्मस्थान म्हणजे दहावे घर यामध्ये शुभ ग्रहांची योग्य मांडणी होते. विशेषतः गुरु, शुक्र, चंद्र आणि बुध हे ग्रह शुभस्थानात असतील तर हा योग अधिक बलवान होतो. यंदाच्या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबरला हा योग जुळून येत आहे. याचा काही राशींना विशेष फायदा अथवा लाभ होण्याची शक्यता आहे, सविस्तर जाणून घेऊ…

100 वर्षांनंतर महालक्ष्मी राजयोग

यंदा २० ऑक्टोबर २०२५ ला दिवाळी साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबर २०२५ रोजी महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. तब्बल १०० वर्षांनी हा शक्तिशाली महालक्ष्मी राजयोग बनला आहे. चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे हा राजयोग तूळ राशीत तयार होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे. यामुळे त्या राशींच्या धन-दौलतीत मोठी वाढ होण्याची आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. महालक्ष्मी राजयोगाचा लाभ मिळणाऱ्या या भाग्यवान राशींमध्ये तीन राशींचा समावेश होते.

‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार?

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी हा महालक्ष्मी राजयोग अत्यंत अनुकूल ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील भौतिक सुख आणि वाहन या भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. या काळात तुम्ही वाहन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करू शकता. तुमचे दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला पदोन्नती किंवा वेतनवाढीची संधी मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबासोबत अविस्मरणीय वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही एखादी आलिशान वस्तू देखील खरेदी करू शकता.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग सकारात्मक सिद्ध होऊ शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील कर्म भावात (दहावे स्थान) तयार होत आहे, जे करिअर आणि व्यवसायाचे स्थान आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या काम-धंद्यात विशेष प्रगती मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. शेअर बाजार किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय या काळात लाभदायक ठरतील. तुम्हाला संधींचा फायदा घेता येईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि वडिलांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील. अविवाहित लोकांच्या जवळच्या व्यक्तीसोबतचे संबंध वाढू शकतात.

कन्या रास

महालक्ष्मी राजयोग तयार झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीतील धन आणि वाणीच्या स्थानावर (दुसरे स्थान) तयार होत आहे. तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यापाऱ्यांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळतील.

त्यामुळे खऱ्या अर्थाने यंदाची येणारी दिवाळी कर्क, मकर आणि कन्या राशीसाठी शुभ योग घेऊन येत आहे. महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींना भविष्यात विलक्षण अशा स्वरूपाचा फायदा होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. या योगामुळे धन व कर्मभाव मजबूत होतात आणि व्यक्तीला व्यवसाय, नोकरी किंवा उद्योगधंद्यात मोठे यश मिळते. महालक्ष्मी राजयोगामुळे अचानक धनलाभ, वारसा, संपत्ती आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता वाढते. या योगाचे परिणाम म्हणजे आयुष्यभर आर्थिक स्थैर्य, उच्च पद व कीर्ती, समाजात मानमरातब तसेच ऐश्वर्यपूर्ण जीवन. याशिवाय या योगामुळे व्यक्ती धार्मिक आणि परोपकारी वृत्तीची असते.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.


About Author

Rohit Shinde

Other Latest News