Maharashtra Jyotirling : महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; नेमक्या काय सूचना दिल्या

पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आढावा बैठकीत सोमवारी (10 नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगासाठी (Maharashtra Jyotirling) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. क्षेत्र भीमाशंकर, क्षेत्र औंढा नागनाथ आणि क्षेत्र घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा. तसेच, परिसरातील सुरू असलेली कामे गतीने करून प्रस्तावित कामांचे योग्य नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

ज्योतिर्लिंग विकास आढावा बैठक

पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर, हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा नागनाथ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आढावा बैठकीत सोमवारी (10 नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. खरं तर देशभरातून लाखो भाविक या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि देवाचे आशीर्वाद घेत असतात. या भाविकांच्या व्यवस्थेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांसाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करून चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध करण्याचे आदेशही दिले आहेत. Maharashtra Jyotirling

याशिवाय मंदिर व्यवस्थापनासाठी काटेकोर नियम असणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विभागानेही येथील प्रस्तावित कामे गतीने करावीत. आज सादर झालेल्या आराखड्यांना उच्चस्तरीय समितीच्या मंजूरीनंतर निधी मिळेल. पुरातत्व विभागाकडून घेण्यात येणाऱ्‍या मंजुरीसाठी केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत एक स्वतंत्र बैठक आयोजित करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

महाष्ट्रातील ज्योतिर्लिंग (Maharashtra Jyotirling)

त्र्यंबकेश्वर : नाशिकजवळ असलेले हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

भीमाशंकर : हे ज्योतिर्लिंग पुण्याजवळ आहे आणि ते पश्चिम घाटाच्या डोंगररांगांमध्ये वसलेले आहे.

घृष्णेश्वर : हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग मानले जाते आणि ते वेरूळ लेणींच्या जवळ आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News