Recipes for Shravan Somwar: हिंदू धर्मात श्रावण सोमवारी भगवान महादेवाची पूजा केली जाते. शिवाय यादिवशी उपवासही केला जातो. उपवासाला काही विशिष्ट पदार्थच खाल्ले जातात. त्यामुळेच आपण उपवासाला खाल्ली जाणारी चटणीची रेसिपी पाहूया…
उपवासाची चटणी बनवण्यासाठी साहित्य-
अर्धा वाटी खोबरे खोवलेले
अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे
७ ते ८ हिरव्या मिरच्या
१०-१२ कढीपत्ता
१ वाटी कोथिंबीर
१ चमचा मीठ
उपवासाची चटणी बनवण्याची रेसिपी-
नारळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
नारळाची चटणी उपवासात खाण्यासाठी तयार आहे.
उपवासाच्या पदार्थांसोबतसोबत ती सर्व्ह करा. ती खूप चविष्ट लागते.
तुम्ही ती फ्रिजमध्ये ठेऊन थंड करून खाऊ शकता. किंवा तसेही खाऊ शकता.





