MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

अंगारक संकष्टी चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा तांदळाची खीर, एकदम सोपी आहे रेसिपी

Published:
अंगारक संकष्टी चतुर्थीला बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी बाप्पाच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात.
अंगारक संकष्टी चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा तांदळाची खीर, एकदम सोपी आहे रेसिपी

Angaraki Sankashti Chaturthi Naivedya Recipes:  गणपती बाप्पाला विघ्नहर्ता मानले जाते. त्यामुळे संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे. तसेच बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी बाप्पाच्या आवडीचे पदार्थ बनवले जातात. आज आपण नैवेद्यासाठी तांदळाच्या खीरची रेसिपी पाहूया…

 

तांदळाची खीर बनवण्यासाठी साहित्य-

 

७५० मिली दूध
२ टेबलस्पून तांदूळ
१/३ कप दूध किंवा चवीनुसार
गरजेनुसार चिरलेले बदाम आणि पिस्ता
१८-२० केशराच्या काड्या
थोडी वेलची पावडर

 

तांदळाची खीर बनवण्याची रेसिपी-

 

सर्वप्रथम तांदूळ धुवून पाण्यात भिजवा.

एका जाड तळाच्या भांड्यात दूध गरम करा आणि उकळी येईपर्यंत शिजवा.

भिजवलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात ठेवा, थोडे पाणी घाला आणि बारीक वाटून घ्या.

उकळत्या दुधात बारीक केलेले तांदूळ घाला आणि ढवळत ५ मिनिटे शिजवा.

आता तुम्हाला दिसेल की ५ मिनिटांत तांदूळ पारदर्शक होऊ लागला आहे, हे तांदूळ  शिजल्याचे लक्षण आहे.

चवीनुसार साखर आणि केशराचे धागे घाला आणि ४ ते ५ मिनिटे सतत ढवळत राहा.

वेलची पावडर आणि चिरलेले बदाम आणि पिस्ता घाला, चांगले मिसळा आणि गॅस बंद करा.

आता खीर २ मिनिटे झाकून ठेवा, बाप्पाच्या नैवेद्यासाठी खीर तयार आहे.