श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात. तसेच समुद्राला नारळ अर्पण करुन प्रार्थना देखील करतात. नारळी पौर्णिमेच्या मंगल दिनानिमित्त आपल्या आप्तजनांना शुभेच्छा पाठवायला विसरू नका.
नारळी पौर्णिमेनिमित्त आप्तजनांना पाठवा खास शुभेच्छा..
१ नारळी पौर्णिमा तुमच्या जीवनात आनंद, आरोग्य, समाधान आणि सौख्याची भरभराट घेऊन येवो
या पवित्र दिनी जीवनात नवे चैतन्य लाभो!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
२ सागराची पूजा-नृत्य अन् गाणी
नारळी पौर्णिमा करितो साजरी
कोळीबांधव अर्पून श्रीफळ सागराच्या चरणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
3 कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी!
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रुपेरी वाळुचा साज!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
4 “दर्या माझ्या भावा
कृपा कर मझं वरी
खळवळू नको आम्हावरी
हीच आमुची मागणी
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…”
5 मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या
नव्या हंगामाची सुरूवात असणार्या
नारळी पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी
सुख, शांती समृद्धी घेऊन येवो,
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
6 कोळीवारा सारा सजलाय गो
कोळी यो नाखवा आयलाय गो
मासळीचा दुष्काळ सरु दे
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!” (Narali Purnima 2025 Wishes In Marathi)
7 घराघरात आज नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ अर्पित
करून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8 कोळी लोकांची खास परंपरा,
दर्याला नारळ अर्पण्याची…
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”
9 नारळी पौर्णिमेला घरात सुगंध दरवळतो
साजूक तुपातील नारळी भाताचा
सागराला सोन्याचा नारळ वाहून
मासेमारीला करतात सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”
10 सण आयलाय गो, आयलाय गो
नारळी पुनवचा..
मनी आनंद मावना
कोळ्यांच्या दुनियेचा
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!





