Navratri Vastu Tips: घरात सुखसमृद्धी आणि आर्थिक भरभराटी हवीय? मग नवरात्रीमध्ये करा ५ वास्तु उपाय

Aiman Jahangir Desai

Navratri Vastu Tips In Marathi:  देशभरात सध्या नवरात्रीची धामधूम सुरु आहे. २२ सप्टेंबरपासून नवरात्रीला प्रारंभ होणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवी दुर्गा मातेच्या भक्तांसाठी अतिशय खास असतात. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मातेच्या नऊ रूपांना प्रिय असणाऱ्या नैवेद्यापासून ते आवडत्या फुलांपर्यंत अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. देवी दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त मनोभावाने भक्ती करत असतात.

नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेचा आशीर्वाद लाभावा आणि घरात सुखसमृद्धी यावी म्हणून अनेक वास्तु उपायसुद्धा केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार हे वास्तु उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते. तसेच देवी दुर्गा माता प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. हिंदू धर्मात वास्तु शास्त्राला विशेष महत्व आहे. त्यामुळेच नवरात्रीदरम्यान कोणते वास्तु नियम करायचे त्याबाबत जाणून घेऊया….

 

मुख्य प्रवेशद्वारासंबंधित नियम-

वास्तु शास्त्रानुसार घराचे मुख्य प्रवेशद्वार हे घराच्या समृद्धतेचे प्रतीक असते. घराच्या मुख्य दरवाजातूनच सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे मुख्य दरवाजाबाबत वास्तु नियम करणे आवश्यक असते. वास्तू शास्त्राप्रमाणे घराचे मुख्य द्वार नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. दरवाजाजवळ कधीही कचरा कुंडी ठेऊ नये. तसेच दरवाजा सहजपणे उघडावा त्यातून आवाज येत असल्यास तो बदलून घ्यावा. अशाने सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

घटस्थापना-
वास्तु शास्त्रानुसार घट नेहमी उत्तर-पूर्व दिशेला स्थापन करावे. ही दिशा अतिशय चांगली समजली जाते. असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते.

देवीची पूजा-
वास्तु शास्त्रानुसार, नवरात्रीमध्ये उत्तर-पूर्व दिशेलाच देवी दुर्गा मातेची पूजा करावी. असे केल्याने चांगला प्रभाव दिसून येतो. असं केल्याने देवी दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद लाभतो. तसेच घरात सुखसमृद्धी आणि धनधान्य येते.

अखंड दीप प्रज्वलित-
नवरात्रीमध्ये अखंड दीप प्रज्वलित केल्याने सकारात्मकता येते आणि देवीचा आशीर्वाद लाभतो. यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून नवरात्रीची सांगता होईपर्यंत दीप प्रज्वलित ठेवावे.

 

शनिदेवाची कृपा-

नवरात्रीमध्ये गरीब आणि गरजू लोकांना काळे तीळ, उडीद डाळ आणि भोजन दान करावे. असे केल्याने शनी देवाची कृपादृष्टी लाभते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या