गणपतीनंतर येणारा नवरात्री (Navratri 2025) हा उत्सव सुद्धा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रीला नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात. नवरात्रीत केलेल्या देवी पूजनामुळे सुख समृद्धी शांती आनंद कीर्ती समाधान आणि वैभव प्राप्त होते तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते अशी मान्यता आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवास केला जातो त्याला नवरत्न असेही म्हणतात…. नवरात्रीची सर्वात खास गोष्ट म्हणजे नऊ दिवस रंगाची साडी घातली जाते त्या नऊ रंगाचे वेगवेगळे असे विशेष महत्त्व आहे…
कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावे?
१) पहिला दिवस
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि या दिवशी केशरी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. केसरी रंग हा सकारात्मक उर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. (Navratri 2025)
२) दुसरा दिवस
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते आणि या दिवशी पांढरा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो.
३) तिसरा दिवस
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा पूजा केली जाते. या दिवशी लाल रंग परिधान करणे शुभ मानले जाते. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे. तसेच तो शक्ती आणि धैर्यासाठी सुद्धा ओळखला जातो.
४) चौथा दिवस
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा पूजा केली जाते. या दिवशी शाही निळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. शाही निळा रंग आत्मविश्वास आणि स्थिरता दर्शवितो. तसेच सुख आणि शांतीचे प्रतीक म्हणून मानला जातो
५) पाचवा दिवस
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी पिवळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते
६) सहावा दिवस
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. या दिवशी हिरवा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. हिरवा रंग समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. तसेच तो जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो.
७) सातवा दिवस
नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी राखाडी रंग परिधान करणे शुभ मानले जाते. राखाडी रंग स्थिरता आणि संतुलनाचे प्रतीक आहे. एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी राखाडी रंग प्रेरित करतो
८) आठवा दिवस
नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी जांभळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो. तसेच अध्यात्म आणि गूढ शक्तीचे प्रतिनिधित्व करतो.
९) नववा दिवस
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी मोरपंखी हिरवा रंग परिधान करणे शुभ मानले जाते.मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. तसेच मोरपंखी हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
यंदा कधी आहे नवरात्री – Navratri 2025
नवरात्री हा सण चांगल्या आणि वाईट यांच्यातील नऊ रात्रीच्या युद्धाचे प्रतीक आहे, ज्यामध्ये दहाव्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय होतो. या काळात देवी दुर्गाची पूजा केली जाते. यंदा शारदीय नवरात्री २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होईल आणि २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीने समाप्त होईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





