शरद पौर्णिमेला पूनम पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रात कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं गेलं. या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीतलावर वास असतो असं सांगितलं जातं. शरद पौर्णिमेच्या रात्री लोकं चंद्राच्या प्रकाशात दूध आटवतात आणि रात्री खुल्या आकाशाखाली ठेवतात. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशीसुद्धा सेवन करतात. या दिवशी चंद्राच्या किरणांमुळे अमृतवृष्टी होते आणि चंद्रप्रकाशात खीर ठेवल्याने ती अमृतसारखी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यंदा 6 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच आज शरद पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. . या दिवशी काही काम करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या शुभ दिवशी चुकूनही पुढील काम करू नका. धार्मिक मान्यतेनुसार पुढील चुका केल्यास माता लक्ष्मी कोपते, त्यामुळे लोकांना आर्थिक संकट आणि गरिबीचा सामना करावा लागतो. चला जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात…
शरद पौर्णिमेला चुकूनही ‘ही’ कामे करु नका
नकारात्मक विचार मनात आणू नये
संध्याकाळी केर काढणं
कधीही संध्याकाळच्या वेळी किंवा त्यानंतर केर काढू नका. कारण देवी लक्ष्मी संध्याकाळनंतरच भ्रमण करते. कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी घराची साफसफाई किंवा केर काढणे टाळावे.

पांढऱ्या वस्तूंचं दान
कोजागिरी पौर्णिमेला तांदूळ, दूध किंवा साखर कोणालाही उधार देऊ नये किंवा घेऊ नये, असे मानले जाते की यामुळे लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात आर्थिक नुकसान होते.
पैशांची देवाण-घेवाण
शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी कोणालाही पैसे उसने देऊ नका किंवा घेऊ नका, कारण असे मानले जाते की यामुळे लक्ष्मीचा कोप होतो आणि घरातून पैसा निघून जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत. या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होतो.
काळे कपडे घालू नका
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका. मान्यतेमुसार या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते, आणि पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. पांढरे कपडे लक्ष्मीला प्रिय आहेत, असे मानले जाते. या दिवशी शुभ्र वस्त्रांमध्ये लक्ष्मीची पूजा केल्यास तिची कृपा प्राप्त होते.
अन्नाचा अपमान
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि भक्तांना आशीर्वाद देते, म्हणून या दिवशी अन्नाचा अपमान करू नये, कारण देवी अन्नपूर्णा ही लक्ष्मीचेच एक रूप आहे आणि अन्नाचा अनादर केल्यास ती नाराज होऊ शकते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून तिला प्रसन्न केले जाते आणि तिच्या आशीर्वादाने घरात समृद्धी येते.
तामसिक अन्न सेवन करू नका
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मांसाहार व मद्यपान करणे टाळावे. याशिवाय या खाद्यपदार्थांमध्ये कांदा, लसूण वापरू नका. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप पावणार नाही.
दूध देणे किंवा घेणे
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध खरेदी किंवा विक्री करू नये. असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत होते आणि व्यक्तीला जीवनात चिंतेचा सामना करावा लागतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











