२०२५ च्या नवरात्री उत्सवात खरंतर एक दुर्मिळ योगायोग चालून आला आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही देशभरात नवरात्राचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. पण यावेळी एक विशेष गोष्ट आहे: हा सण ९ ऐवजी १० दिवस चालेल. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, तृतीया तिथी दोन दिवस चालेल, ज्यामुळे नवरात्रात एक दिवस वाढ होईल. २२ सप्टेंबरपासून सुरू होणार यंदाचा नवरात्री उत्सव काहीसा विशेष आहे.
सण-उत्सवांचा महिना जवळ आला आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. या नऊ दिवसांमध्ये आदिशक्ती आई दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची भक्तीभावाने पूजा केली जाते. यावर्षीची शारदीय नवरात्री कधी सुरू होत आहे आणि घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे हे जाणून घेऊया.
२२ सप्टेंंबरपासून नवरात्री उत्सवाची सुरूवात
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी सोमवारी 22 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 01 वाजून 23 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी रात्री 02 वाजून 55 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीला विशेष महत्त्व असल्याने शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर पासून होईल. याच दिवशी घटस्थापना करून दुर्गा देवीच्या पूजेला सुरुवात केली जाईल.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या!
वैदिक गणितानुसार 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेसाठी शुभ वेळ सकाळी 06 वाजून 09 मिनिटांपासून सकाळी 08 वाजून 06 मिनिटांपर्यंत आहे. याव्यतिरिक्त अभिजित मुहूर्तामध्ये दुपारी 11 वाजून 49 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 38 मिनिटांपर्यंतही घटस्थापना करता येते. साधक आपल्या सोयीनुसार या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करू शकतात. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या तिथीला शुक्ल आणि ब्रह्म योग असे अनेक शुभ संयोग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्यास साधकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सुख-सौभाग्यात वाढ होते असे मानले जाते.
नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण देवी दुर्गेच्या विविध रूपांची उपासना करण्यासाठी साजरा केला जातो. नवरात्रीत भक्तगण उपवास, आरती, भजन आणि गरबा-दांडिया यांसारख्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात. नऊ दिवसांत देवीची विविध स्वरूपे पूजली जातात. या काळात शाकाहार, संयम आणि भक्तीला विशेष महत्त्व दिले जाते. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर भारत आणि दक्षिण भारतात नवरात्री वेगवेगळ्या परंपरांनी साजरी केली जाते. २२ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या काळात खरंतर ही नवरात्री असणार आहे.
भारतातील नवरात्रीची वाढती लोकप्रियता
भारतातील नवरात्रीची लोकप्रियता अत्यंत मोठी आहे. हा सण देवी दुर्गेच्या शक्तीचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत लाखो भक्त देवीची पूजा, आरती, उपवास आणि भजन करतात. गुजरातमध्ये दांडिया आणि गरबा विशेष प्रसिद्ध आहेत, तर महाराष्ट्रात देवीचे मंडप आणि घटस्थापना मोठ्या श्रद्धेने केली जाते. उत्तर भारतात रामलीला आणि दशहरा याच काळात साजरे होतात. दक्षिण भारतातही देवीच्या विविध रूपांची विशेष पूजा होते. या सणात भक्तिभावाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांनाही तितकेच महत्त्व आहे. नवरात्रीमुळे सामाजिक एकता, श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम घडतो, त्यामुळेच भारतभर हा सण लोकप्रिय ठरतो.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.





