Numerology : लग्नात वारंवार अडथळे येतायत? डाव्या हातावर लिहा हा अंक

Asavari Khedekar Burumbadkar

आज-काल लग्न ठरलं अवघड झाले आहे. खास करून मुलांच्या बाबतीत ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर दुसरीकडे मुले स्वतःच्या आयुष्यात संघर्ष करताना बघायला मिळतायत. परिणामी या ना त्या कारणाने अनेक मुला मुलींचे लग्न रखडलेले आहेत. लग्न ठरत नसल्याने अनेकजण नैराश्यात जातात. काहीजण चुकीच्या मार्गाला लागतात. अशावेळी अंकशास्त्रातील (Numerology) एक उपाय नक्कीच तुमच्या कामाला येऊ शकतो.

हाताच्या तळव्यावर 6 आकडा टाका (Numerology)

अंकशास्त्रानुसार, (Numerology) शुक्रवारी डाव्या तळहातावर ६ हा आकडा लिहा. ज्या लोकांचे लग्न अनेक वर्षापासून रखडले आहे किंवा जमलेलं लग्न तुटले आहे अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूपच फायदेशीर मानला जातो. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि योग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते. अंकशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते हा उपाय पूर्ण श्रद्धेने केल्यास सर्वात प्रभावी ठरतो. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने उपाय करता तेव्हा नक्कीच त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. कारण अंकशास्त्र हा केवळ संख्येचा विषय नाही तर तो तुमच्या श्रद्धेवर आणि विचारशक्तीवर देखील अवलंबून असतो.

6 आकड्यामागच महत्त्व काय

अंकशास्त्रात, (Numerology) ६ हा आकडा प्रेम, संतुलन, आकर्षण आणि स्थिरतेचे प्रतीक मानला जातो. हा शुक्र ग्रहाचा आकडा आहे, जो व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि सौंदर्य वाढवतो. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो ते समाधानी जीवन जगतात आणि नातेसंबंधांमध्ये आनंदी असतात. म्हणूनच जर तुम्ही आयुष्यात एकटी असाल आणि जीवनसाथीच्या प्रतीक्षेत असाल तर शुक्रवारी सकाळी अंघोळ  केल्यानंतर, तुमच्या डाव्या अंगठ्याच्या खालच्या बाजूला गुलाबी, सोनेरी किंवा लाल पेनाने ६ हा आकडा लिहा. दर शुक्रवारी हा उपाय करा आणि दिवसभरात अनेक वेळा या आकड्याकडे पहा. असे म्हटले जाते की असे केल्याने शुक्राची शक्ती सक्रिय होते आणि लग्नाची शक्यता वाढते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या