आजकाल प्रत्येक जण पैशाच्या मागे लागला आहे. पैसा असेल तरच माणसाला या जगात किंमत आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसे असावे, जेणेकरून आपणही इतरांसारखे आरामदायी आयुष्यात जगू शकतो. पैसा कमवण्यासाठी अनेकजण जिवाचं रान करतात, दिवस-रात्र काबाडकष्ट करतात. मात्र तरीही कितीही पैसा कमावला तरी काही जणांच्या हातात पैसा टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा त्यांच्या हातून जातोच. अशावेळी काय करावे?? आपल्या हातात पैसा कसा टिकवावा?? यावरचा उपाय प्रेमानंद महाराज (Premanad Maharaj) यांनी सांगितला आहे. प्रेमानंद महाराज यांच्या मते,पैसा हा केवळ कमावण्यामुळे तुमच्या हातात टिकणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करावे लागतील, काही सवयी सोडाव्या लागतील.
1) पैशांचा आदर करा –
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जो पैसा कमवता त्या पैशाचा आदर करा. पैसा हे म्हणजे फक्त खर्च करण्याची वस्तू नाही तर तुम्हाला सर्वात ताकदवान बनवणारी वस्तू आहे. त्यामुळे जे लोक पैशांचा योग्य आदर करतात, आणि हातात आलेला पैसा काळजीपूर्वक वापरतात अशा लोकांच्या हातातच पैसा टिकतो. परंतु जे लोक याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या हातून पैसा दिवसेंदिवस निसटून जातो. अशा लोकांनी कितीही पैसा कमावला तरी तो त्यांच्याकडे टिकत नाही.

2) पैशाचा दिखावा करू नका
आपल्यापैकी अनेक जण असे असतात ज्यांना त्यांच्याकडील पैशाच्या गर्व असतो, अहंकार असतो. असे लोक त्यांच्याकडील पैशाचा देखावा करतात. आणि समाजापुढे मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. मोठेपणाच्या नादात त्यांच्याकडे असलेल्या पैसा ते चुकीच्या ठिकाणी खर्च करतात. परिणामी कितीही पैसा कमवला तरी तो त्यांच्याकडे टिकत नाही. त्यामुळे प्रेमानंद महाराजांच्या मते पैशाचा देखावा कधीच करू नका.
3) पैशांची बचत करा Premanand Maharaj
तुमच्या हातात जर पैसा टिकवायचा असेल तर त्या पैशाची बचत करणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) म्हणतात जर तुम्ही हजार रुपये कमवत असाल तर त्यातील 25 टक्के हिस्सा हा बचत करा, तो पैसा कधीही खर्च करू नका, कारण जेव्हा तुमच्यावर मोठं संकट येईल तेव्हा हाच पैसा तुमच्या उपयोगाला येणार आहे.
4) कर्ज घेऊ नका –
प्रेमानंद महाराज म्हणतात व्यक्तीनं आपल्या आयुष्यात कधीही कर्ज घेता कामा नाही, कारण एकदा कर्ज घेतलं की तो त्या कर्जातच अडकून राहतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कर्ज घेतो त्यानंतर आपण सतत नवनवीन कर्ज घेण्याच्या उद्योगाला लागतोय. परिणामी ते कर्ज फेडताना आपल्या नाकी नऊ येते. कर्जाचे हप्ते फेडण्याचा आपला आयुष्य निघून जातो आणि आपल्या खिशात पैसा राहतच नाही
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











