MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

Raksha bandhan 2025 : यंदा 2 दिवस रक्षाबंधन साजरा करता येणार? नेमका काय आहे गोंधळ, राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता?

Raksha bandhan 2025 : यंदा 2 दिवस रक्षाबंधन साजरा करता येणार? नेमका काय आहे गोंधळ, राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त कोणता?
Written by:Smita Gangurde
यंदा श्रावण पौर्णिमा दोन दिवस आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा सणही यंदा दोन दिवस साजरा केला जाणार का, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

Raksha bandhan 2025 Shubh Muhurta: भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन. यंदा श्रावण पौर्णिमा दोन दिवस आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा सणही यंदा दोन दिवस साजरा केला जाणार का, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.

कधी आहे रक्षाबंधन? l When is Raksha Bandhan?

त्यातही जर एकच दिवस रक्षाबंधन साजरा करता येणार असेल तर ती तारीख कोणती असेल याबाबतही गोंधळ आहे. ८ ऑगस्ट की ९ ऑगस्ट… नेमकी कोणत्या दिवशी रक्षाबंधन साजरा करता येणार? याबाबत जाणून घेऊया.

श्रावण पौर्णिमा तिथी ८ ऑगस्टच्या दुपारी २.१२ वाजल्यापासून ९ ऑगस्टच्या दुपारपर्यंत १.२४ पर्यंत असेल. त्यामुळे उदिया तिथीनुसार रक्षाबंधन ९ ऑगस्ट रोजी साजरा करणं शुभ राहील असं सांगितलं जात आहे. रक्षाबंधनात भद्राचा परिणाम नाही. अशात संपूर्ण दिवस आपल्या लाडक्या भावाला राखी बांधता येऊ शकते. यंदाच्या वर्षी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त ९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.४७ वाजेपासून दुपारी १.२४ पर्यंत असेल. त्यामुळे या कालावधीत तुम्ही रक्षाबंधन करू शकता.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? l Shubh muhurta for Raksha bandhan

याचा अर्थ रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीला राखी बांधण्यासाठी साधारण साडे सात तासांचा वेळ मिळेल. या कालावधीत बहीण आधी देवाला राखी अर्पण करेल आणि भावाला विधीनुसार राखी बांधेल. यातून त्यांचं नातं अधिक घट्ट होईल आणि जीवनात सुख-समृद्धीही लाभेल.

यंदा रक्षाबंधनावर सौभाग्य आणि शुभ योग आहे. सोबतच अशुभ भ्रद्रा काल सूर्योदयपूर्वी संपुष्टात येईल. त्यामुळे यंदाचं रक्षाबंधनाचा दिवस विशेष शुभ असेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)