Paneer Shahi Kheer Marathi Recipe: यंदा ९ ऑगस्टला रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंनधन हा सण बहीण भावासाठी फारच खास असतो. या दिवशी बहीण भावासाठी आवर्जून काहीतरी गोड पदार्थ बनवते. या रक्षाबंनधनाला तुम्हालाही काहीतरी गोड बनवायचे असेल, तर ही पनीर शाही खीरची रेसिपी ट्राय करू शकता.
पनीर खीर बनवण्यासाठी साहित्य-
१/२ लिटर फुल क्रीम दूध
१०० ग्रॅम पनीर (घरगुती)
५-६ चमचे साखर
१/४ कप काजू, बदाम, पिस्ता, मनुका
केसराचे ७-८ धागे
५-६ लहान वेलची
सुके मेवे
तळण्यासाठी १ चमचा देशी तूप
पनीर खीर बनवण्याची रेसिपी-
सर्वप्रथम, पनीर शाही खीर बनवण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करा. घरी पनीर बनवा आणि किसून घ्या. सुक्या मेव्याचे लहान तुकडे करा. वेलची पावडर बनवा.
आता गॅसच्या आचेवर एका पॅनमध्ये फुल क्रीम दूध ठेवा. ते मंद आचेवर अर्धे होईपर्यंत उकळवा. त्यात केशर घाला. दूध घट्ट होत असताना, दुसरीकडे, नॉन-स्टिक पॅनमध्ये एक चमचा देशी तूप घाला आणि चिरलेले सुके मेवे थोडा वेळ तळा.
दूध घट्ट झाल्यावर, त्यात किसलेले पनीर घाला. थोडा वेळ उकळवा जेणेकरून पनीर मऊ होईल. नंतर त्यात साखर घाला.
वेलची पावडर घाला. सजवण्यासाठी काही सुके मेवे ठेवा आणि बाकीचे घाला.
थोडा वेळ उकळा आणि गॅस बंद करा. स्वादिष्ट आणि पौष्टिक पनीर शाही खीर सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा. पिस्ता, काजू आणि बदामांनी सजवा. थंड झाल्यावर सर्व्ह करा.





