Rakshabandhan Special Recipes: रक्षाबंनधन हा सण बहीण भावासाठी फारच खास असतो. या दिवशी बहीण भावासाठी आवर्जून काहीतरी गोड पदार्थ बनवते. या रक्षाबंनधनाला तुम्हालाही काहीतरी गोड बनवायचे असेल, तर ही शाही तुकड्याची रेसिपी ट्राय करू शकता.
शाही तुकडा बनवण्यासाठी साहित्य-
४-५ ब्रेडचे तुकडे
२ वेलची
चिमूटभर फूड कलर
१ कप साखर
१ कप पाणी
सजावटीसाठी
२ टीस्पून रबरी
१ टीस्पून चिरलेला मिक्स ड्रायफ्रुट्स
शाही तुकडा बनवण्याची रेसिपी-
ब्रेडचे तुकडे इच्छित आकारात कापून तुपात कुरकुरीत तळा.
एका भांड्यात साखर, पाणी, वेलची आणि थोडे केशर किंवा खाण्यायोग्य रंग घालून पाक तयार करा.
तळलेले ब्रेडचे तुकडे कोमट पाकात घाला आणि ५ मिनिटे तसेच ठेवा.
सर्विंग प्लेटमध्ये जसे आहे तसे सर्व्ह करा किंवा थोडी क्रीम किंवा रबरी आणि सुक्या मेव्याने सजवा.





