Rashi Bhavishya : 2026 मध्ये शनी करणार कमाल!! या लोकांना देणार सुखाचे दिवस

Asavari Khedekar Burumbadkar

Rashi Bhavishya : वैदिक कॅलेंडरनुसार, २०२६ मध्ये अनेक प्रमुख आणि लघु ग्रह त्यांच्या राशी आणि नक्षत्रांमध्ये बदल करतील. यामध्ये कर्म देणारे शनिदेव यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. शनिदेव संपूर्ण २०२६ वर्ष मीन राशीतून भ्रमण करतील. शनिदेव प्रथम २० जानेवारी रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रातून, त्यानंतर १७ मे रोजी रेवती नक्षत्रातून आणि शेवटी ९ ऑक्टोबर रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रातून भ्रमण करतील. शनिदेव इतर ग्रहांसोबत तीन वेळा संयोग करून नवपंचम राजयोग करतील. यामुळे काही राशींना सुखाचे दिवस येतील. या राशींना करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी (Rashi Bhavishya)

शनि देवामुळे तयार झालेल्या राजयोगाचा फायदा, वृषभ राशीच्या लोकांना होणार आहे. कारण शनिदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि नफ्याच्या घरात संक्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात तुमची आर्थिक प्रगती होईल. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा परत मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुमच्या डोक्यात आला असेल तर हीच ती योग्य वेळ म्हणावी लागेल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांनाही फायदा होईल. Rashi Bhavishya

कुंभ राशी

शनीचे तीन वेळा होणारे संक्रमण आणि राजयोगाची निर्मिती कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. शनि तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तुमच्या राशीतून दुसऱ्या घरातही भ्रमण करत आहे. त्यामुळे, तुम्हाला अनपेक्षीत धनलाप होण्याची शक्यता आहे. खूप दिवसापासून तुमच्या डोक्यावर असलेले कर्ज दूर होईल. तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. समाजात तुमचा चांगला प्रभाव पडेल, मानसन्मान वाढेल. प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. तुम्हाला पैशाची कोणती अडचण भासणार नाही. (Rashi Bhavishya)

तूळ राशी

शनिदेवाचे तीन वेळा नक्षत्र बदलणे आणि राजयोग तुळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. शनि तुमच्या राशीतून सहाव्या घरात संक्रमण करेल. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. कोर्टात जर तुमची कोणती केस चालू असेल तर त्या तुम्हाला यश मिळेल.  तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थिती किंवा आव्हानावर सहज मात कराल आणि यशाच्या मार्गावर पुढे जाल. यामुळे तुमच्या मनात आणि जीवनात आनंद आणि आनंद येईल.  करिअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या