सध्या सर्वांचं लक्ष्य दिवाळीकडे लागलं आहे. कधी एकदा दिवाळी येतेय असं सर्वाना झालंय. त्यादृष्टीने तयारीची लगबग सुद्धा सुरु आहे. यावर्षी २० ऑक्टोबरला दिवाळी आहे. जोतिषशात्रात सुद्धा दिवाळीचे मोठं महत्व आहे. जोतिषशास्त्रानुसार, (Rashi Bhavishya) या वर्षी दिवाळीतील ग्रहांच्या स्थिती अत्यंत शुभ ‘राजयोग’ निर्माण करत आहेत. या योगात राजवैभव, असाधारण यश आणि अफाट संपत्ती देण्याची क्षमता आहे. ज्या व्यक्ती मागील अनेक दिवसापासून संघर्ष करत आहेत किंवा संकटे आणि अडचणीत आहेत अशा लोकांच्या आयुष्यात या महाराजयोगामुले चांगले बदल होताना बघायला मिळेल. गरिबी आणि कष्ट संपतील. यंदाच्या दिवाळीत घडणाऱ्या या विशेष महाराजयोगाचा फायदा कोणकोणत्या राशींना होईल ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.
१) मेष रास
मेष राशीच्या (Rashi Bhavishya) व्यक्तींना दिवाळीतील महाराजयोग गेमचेंजर ठरणार आहे. खास करून नोकरी आणि करिअरच्या बाबतीत मेष राशीच्या लोकांना अनुकूल परिस्थिती आहे. ही दिवाळी तुमच्यासाठी पद, पैसा आणि प्रतिष्ठा घेऊन येत आहे. मेष राशीच्या व्यक्तींवर लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद असेल. तुमच्या जुन्या काही अडचणी दूर होतील. अडकलेले पैसे परत मिळतील. अचानक तुम्हाला आर्थिक धनलाभ होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांनी यंदाच्या दिवाळीच्या रात्री ‘श्रीसूक्त’चे पठण करावे आणि भगवान हनुमानाला बुंदी अर्पण करावी.

२) वृषभ- Rashi Bhavishya
वृषभ राशीसाठी, आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सुख आणि भौतिक सुखांच्या क्षेत्रात ‘राजयोग’चा प्रभाव दिसून येईल. नशिबाची साथ तुम्हाला असल्याने जिथे लाथ माराल तिथे तुम्ही पाणी काढाल. दिवाळीनंतर वृषभ राशीचे लोक आरामदायी जीवन जगू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद तुमच्या बाजूने लागू शकतो. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय उत्तम राहील, परंतु विचारपूर्वक आणि योग्य ठिकाणीच गुंतवणूक करा. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. तुम्ही मोठे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. फक्त दिवाळीच्या पूजेदरम्यान लक्ष्मी मातेला कमळाचे फूल अर्पण करा Rashi Bhavishya
३) कन्या
कन्या राशीसाठी, दिवाळीतील महाराजयोग तुमची आर्थिक स्थिती, बचत आणि तुमच्या बोलण्याच्या प्रभावाला मजबूत करेल. तुमची बुद्धिमत्ता आणि योग्य निर्णय तुम्हाला मोठे आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतात. गुंतवणूक किंवा लॉटरीमधून अचानक मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा महाराजगोय अतिशय लाभदायक ठरेल. नोकरदार वर्गाला नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. फक्त तुम्हाला दिवाळीला भगवान गणेशाला २१ दुर्वा अर्पण कराव्या लागतील. तसेच दररोज तुळशीच्या रोपाला प्रदक्षिणा घालावी लागेल.
४) मकर
या राजयोगाच्या प्रभावाखाली मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. शनीच्या आशीर्वादाने, तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात स्थिरता मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल, साहजिकच तुम्हाला बढती मिळू शकते आणि तुमचा पगार सुद्धा वाढेल. तुमच्या काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या सुद्धा दिवाळीनंतर मिटतील. फक्त दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











