ग्रहांच्या हालचालीचे आपल्या जीवनात शुभ अशुभ परिणाम पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रात (Rashi Bhavishya) याला खूप महत्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. पंचांगानुसार, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ५९ मिनिटांनी मंगळ आणि शनी एकमेकांपासून १०८ डिग्री कोणीय स्थितीत असतील, मंगळ-शनीच्या या योगामुळे त्रिदशांक योग निर्माण होईल. या योगामुळे काही राशींच्या लोकांना सुखाचे दिवस येणार आहेत. १४ नोव्हेंबर पासून त्यांच्या आयुष्यात फक्त पैसाच पैसा असणार आहे.
वृषभ
मंगळ-शनीच्या त्रिदशांक योगामुळे वृषभ राशीच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे (Rashi Bhavishy). तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.. तुम्ही अगदी राजेशाही जीवन जगाल. १४ नोव्हेंबर नंतर घरात नवनवीन वस्तूंची खरेदी होऊ शकते. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते. साहजिकच त्यामुळे पगारवाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहिलं. खास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

कन्या (Rashi Bhavishya)
कन्या राशीसाठी त्रिदशांक योग अत्यंत फलदायी ठरेल. मागील काही महिन्यापासून तुमची रखडलेली कामे 14 नोव्हेंबर नंतर पूर्ण होतील. तुमचे आरोग्याची स्थिती अतिशय उत्तम राहील. जुनी संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत. घरातील वातावरण अत्यंत सकारात्मक राहील आणि घरातील सदस्यांबद्दलचे प्रेम वाढेल. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील. एखादी गोड बातमी मिळेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.
मकर
मकर राशीसाठी देखील हा योग खूप उपयुक्त ठरेल. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. खास करून व्यावसायिकांसाठी 14 नोव्हेंबर नंतरचा काळ चांगला असेल. मकर राशीच्या लोकांना प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. घरात सुख, शांती नांदेल. तुमचं नशीब तुमच्या सोबत असल्याने कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. जुने मित्र भेटतील आणि बाहेर फिरण्याचा योग जुळून येईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











