आपल्या भारतात राशिभविष्य (Rashi Bhavishya) बद्दल अनेकांना कुतूहल असते. आपल्या राशीनुसार आपलं भविष्य काय असेल हे अनेकांना जाणून घ्यायचं असतं. ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिना काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. ऑक्टोबर महिन्यात पाच मोठे ग्रह आपली दिशा बदलणार आहेत या ग्रहांच्या गोचऱ्यामुळे 3 दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत. हे राजयोग काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. या राशीच्या लोकांचे जणू अच्छे दिन ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे
कोणते ग्रह दिशा बदलणार?
सर्वात आधी ३ ऑक्टोबरला शनी रोजी नक्षत्र परिवर्तन करेल ज्यामुळे बुध ग्रह आपली रास बदलेल. यानंतर ९ ऑक्टोबरला शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. १७ ऑक्टोबरला सूर्य तुला राशीत प्रवेश करेल. सर्वात शेवटी १८ ऑक्टोबरला गुरु कर्क राशीत गोचर करेल. या ग्रह गोचरांमुळे नवपंचम, मालव्य आणि रुचक असे 3 शुभ राजयोग तयार होतील. हे राजयोग सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल.

1) सिंह (Rashi Bhavishya)
सिंह राशीच्या लोकांसाठी ऑक्टोंबर महिना खूप शुभ ठरू शकतो. नोकरदार वर्गाला ऑक्टोबर मध्ये कामात बढती मिळण्याची शक्यता आहे साहजिकच या राशीच्या लोकांचा पगारही वाढेल. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण अत्यंत सकारात्मक राहील. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. जर तुमची काही कामे अनेक दिवसापासून अडकले असतील तर ती सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सुराला लागण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना अतिशय चांगलं राहील. उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. परंतु जिभेवर थोडा ताबा ठेवा. कोणी नाराज होणार नाही याची काळजी घ्या.
2) कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसाती सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता असली, तरी ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या बदलामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. ऑक्टोंबर पासून तुम्हाला खऱ्या अर्थाने नशिबाची साथ मिळेल… कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन परिवर्तन घडेल. ज्या गोष्टी तुम्ही अनेक दिवसापासून मिळवण्याचा प्रयत्न करत आहात त्या गोष्टी मिळवण्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायिकदारांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. नवनवीन प्रोजेक्ट ऑक्टोबर नंतरच मिळतील. नवीन प्रेम मिळण्याची शक्यता आहे. तुमचं लग्न झालं असेल तर नवरा बायको सोबतच नातं आणखी घट्ट होईल. ऑक्टोंबर महिन्यात एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











