MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

Shravan 2025 : श्रावण महिन्यात उपवास आहे? बनवा राजगिऱ्याची पुरी, जाणून घ्या रेसिपी

Published:
श्रावणातील सोमवारी शंकर देवाची पूजा केली जाते आणि आवर्जून उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी तुम्ही फराळ करण्यासाठी राजगिऱ्याच्या पुऱ्या बनवू शकता.
Shravan 2025 : श्रावण महिन्यात उपवास आहे? बनवा राजगिऱ्याची पुरी, जाणून घ्या रेसिपी

श्रावण महिना हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. असं म्हणतात श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने मनोकामना पूर्ण होतात. आणि उपवास म्हटला की घराघरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रावणातल्या उपवासात विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, आज आम्ही अशाच एका सोप्या रेसिपी बद्दल सांगणार आहोत,  त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. जाणून घेऊया….

साहित्य

  • राजगिरा पीठ
  • बटाटा 
  • मीठ (उपवासाचे)
  • तेल 
  • पाणी

कृती

  • परातीत राजगिरा पीठ घ्या. त्यात मीठ आणि स्मॅश केलेला बटाटा टाका.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ थोडे घट्ट असावे.
  • मळलेल्या पिठाला 10 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
  • पिठाचे छोटे गोळे करून घ्या आणि पुऱ्या लाटून घ्या.
  • गरम तेलात मध्यम आचेवर पुऱ्या तळून घ्या.
  • गरमागरम राजगिऱ्याच्या पुऱ्या उपवासाच्या भाजी किंवा आमटीसोबत सर्व्ह करा. 

टीप

  • तुम्ही पिठात थोडेसे जिरे किंवा मिरची पावडर देखील टाकू शकता.
  • पुऱ्या तळताना तेल चांगले गरम असावे, नाहीतर त्या तेल पिऊ शकतात.
  • उपवासाच्या इतर पदार्थांसोबत, जसे की बटाट्याची भाजी किंवा शेंगदाण्याची आमटी, राजगिऱ्याच्या पुऱ्या खूप छान लागतात.