MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Nag Panchami 2025 : यंदा नागपंचमीचा सण कधी साजरा केला जाणार? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Published:
हिंदू धर्मात श्रावण हा व्रतकैवल्यांचा असा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात बरेच सण येतात. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी..
Nag Panchami 2025 : यंदा नागपंचमीचा सण कधी साजरा केला जाणार? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

हिंदू धर्मात नाग पंचमीचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात हा सण साजरा केला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नाग पंचमी साजरी केली जाते. यंदा नागपंचमीचा सण कधी साजरा केला जाणार आहे? या सणाचं महत्त्व काय? चला जाणून घेऊयात…

यंदा नागपंचमीचा सण कधी?

पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीची तिथी 28 जुलैला रात्री 11 वाजून 23 मिनिटांनी सुरु होते. तसेच 29 जुलैला रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार नागपंचमी हा सण 29 जुलैला साजला केला जाईल.

शुभ मुहूर्त

नागपंचमीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 42 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत असेल. तसेच दुपारी 3 वाजून 51 मिनिटे ते संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटांपर्यंत असेल.

नागपंचमीचं महत्त्व 

नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे, जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी नागांची (सापांची) पूजा केली जाते. नाग हे हिंदू धर्मात महत्वाचे मानले जातात आणि त्यांना देवाचा दर्जा दिला जातो. नागपंचमीला नागांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. भगवान श्रीकृष्णाने यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव केला, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो, असे मानले जाते. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो, असे मानले जाते. 

नागपंचमी पूजा कशी करावी?

  • लाकडी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढा किंवा मातीचा नाग आणा.
  • नागाला पाण्याने आणि दुधाने स्नान घाला.
  • नागाला गंध, फुले आणि अक्षता अर्पण करा.
  • नागाला लाह्या, कच्चे दूध, मोदक आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा.
  • ‘ॐ नागदेवाय नमः’ या मंत्राचा जप करा. 
  • नैवेद्य दाखवून नागदेवतेची आरती म्हणा.
  • नागदेवतेला आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याची प्रार्थना करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)