भाऊ आणि बहिणींच्या नात्याचे महत्व सांगणारा एक पवित्र सण आहे, जो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त घरच्या घरी बनवू शकता असा गोड पदार्थ सांगणार आहोत. जो तु्म्ही सहज तयार करु शकता, चला जाणून घ्या सोपी रेसिपी….
केसर खीर
साहित्य
- 1/2 वाटी तांदूळ (शिजवण्यासाठी)
- 1 लिटर दूध
- 1/4 कप साखर (आवडीनुसार कमी-जास्त)
- 10-12 केसरचे धागे
- 1/2 चमचा वेलची पूड
- 1/4 कप चिरलेले बदाम आणि पिस्ता (सजावटीसाठी)
कृती
- एका वाटीत थोडेसे गरम दूध घ्या आणि त्यात केशरचे धागे भिजत ठेवा.
- तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरमध्ये थोडेसे पाणी घालून शिजवून घ्या.
- एका मोठ्या पातेल्यात दूध गरम करा.
- दुधात साखर आणि शिजवलेले तांदूळ घालून चांगले मिक्स करा.
- दूध थोडे घट्ट झाल्यावर त्यात भिजवलेले केशर आणि वेलची पूड घाला.
- दूध थोडे आटवून घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
- खीर गरम किंवा थंड झाल्यावर त्यावर चिरलेले बदाम आणि पिस्ता घालून सजवा.
टीप
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.
- तुम्ही खीर शिजवताना त्यात थोडेसे खवा किंवा मिल्क पावडर देखील घालू शकता.
- गरमागरम किंवा थंडगार खीर सर्व्ह करा.





