श्रावण महिना हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. असं म्हणतात श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने मनोकामना पूर्ण होतात. आणि उपवास म्हटला की घराघरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रावणातल्या उपवासात विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, आज आम्ही अशाच एका सोप्या रेसिपी बद्दल सांगणार आहोत, त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. जाणून घेऊया….
राजगिरा खाण्याचे फायदे
राजगिरा हे एक पौष्टिक धान्य आहे, जे उपवासाच्या दिवसात विशेषतः खाल्ले जाते. यात प्रथिने, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
राजगिरा लाडू साहित्य
- राजगिरा
- तूप
- गूळ
- शेंगदाणे (भाजलेले)
- वेलची पूड
कृती
- एका कढईत तूप गरम करून त्यात चिरलेला गूळ वितळवून घ्या.
- गूळ वितळल्यावर त्यात राजगिरा, भाजलेले शेंगदाणे आणि वेलची पूड टाका.
- मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
- मिश्रण थोडे गरम असतानाच त्याचे लाडू वळायला घ्या.
- लाडू वळताना हाताला थोडे तूप लावा.
- गरमागरम लाडू तयार आहेत.
टीप
- तुम्ही लाडूंमध्ये तुमच्या आवडीनुसार सुके खोबरे किंवा खसखसही घालू शकता.
- गूळ आणि तूप यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






