श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. यात श्रावणात विशेषत: सोमवार, शनिवारी उपवास करण्याची पद्धत आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात आणि संध्याकाळी व्रत सोडल्यानंतर काही तरी हलकं-फुलकं, पण गोड आणि पोषणमूल्य असलेलं काही तरी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी पारंपरिक चव आणि पौष्टिकता लाभलेली ‘मखाना मलाई खीर’ बनवू शकता. यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या…
साहित्य
- १ कप मखाना (कमळ gatta)
- अर्धा लिटर दूध
- १/२ कप साखर (आवडीनुसार कमी-जास्त)
- वेलची पूड
- थोडे केशर (optional)
- बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ता (सजावटीसाठी)
- तूप
कृती
- प्रथम, एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यात मखाना मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- नंतर, त्याच पॅनमध्ये दूध गरम करून त्यात भाजलेले मखाना टाका.
- दूध थोडे आटल्यावर साखर आणि वेलची पूड टाका.
- केशर असल्यास, ते गरम पाण्यात भिजवून दुधात टाका.
- गरम असतानाच खीर बाऊलमध्ये काढून घ्या.
- बारीक चिरलेल्या बदाम आणि पिस्ताने सजवून गरमागरम किंवा थंडगार सर्व्ह करा.
टीप
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स वापरू शकता.
- मखाना भाजताना तो जास्त जळू नये, याची काळजी घ्या.
- तुम्ही ही खीर उपवासासाठी बनवत असाल, तर उपवासाचे साहित्य वापरा.





