श्रावण महिन्यात अनेकजण उपवास करतात. यात श्रावणात विशेषत: सोमवार, शनिवारी उपवास करण्याची पद्धत आहे. पण या उपवासाच्या दिवशी अनेकांना काय खावे असा प्रश्न पडतो. यात नेहमी बटाट्याची भाजी, वरईचा भात किंवा रोटी, साबूदाण्याची खिचडी, उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ खाऊन खूप वैगात येतो. तुम्ही उपवासाला वेगळं काही करू शकता. तुम्ही श्रावणात उपवासासाठी कच्च्या केळीची चकली बनवू शकता. यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या…
साहित्य
- 2-3 कच्ची केळी
- 1/2 वाटी साबुदाणा
- 1/4 वाटी शेंगदाणे
- 1 चमचा जिरे
- 1/2 चमचा लाल मिरची पावडर
- चवीनुसार मीठ (सेंधा मीठ उपवासासाठी)
- तेल
कृती
- कच्च्या केळ्यांची सालं काढून ती किसून घ्या.
- किसलेली केळी, भिजवलेला साबुदाणा, शेंगदाणा कूट, जिरे, मिरची पावडर आणि मीठ एकत्र करून चांगले मळून घ्या.
- मळलेल्या मिश्रणातून लहान गोळे करून घ्या.
- चकलीच्या साच्यात मिश्रण भरून गरम तेलात चकल्या तळून घ्या.
- कुरकुरीत झाल्यावर टिशू पेपरवर काढून घ्या.
टीप
- तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले आणि मीठ कमी-जास्त करू शकता.
- चकल्या तळताना तेल मध्यम गरम असावे.
- गरमागरम चकल्या दह्यासोबत किंवा चटणीसोबत खायला छान लागतात.
- तुम्ही ह्या चकल्या उपवासाला नक्की करून बघा.





