कल्की जयंती भगवान विष्णूंच्या कल्की अवताराच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. कल्की, विष्णूंचे दहावे आणि शेवटचे अवतार मानले जातात, जे कलियुगाच्या शेवटी पृथ्वीवर येतील आणि धर्माची पुनर्स्थापना करतील, असे मानले जाते, या दिवशी, भक्त कल्की देवाची पूजा करतात आणि त्यांच्या अवताराच्या प्रतीक्षेत असतात. दरवर्षी, श्रावण महिन्यात, शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी भगवान कल्कि जयंती साजरी केली जाते. त्यानुसार आज 30 जुलै 2025 रोजी कल्कि जयंतीचा उत्सव बुधवारी साजरा केला जात आहे. या दिवसाचे महत्त्व काय? कोण आहेत कल्कि भगवान? कलियुगात ते कधी अवतार घेणार? जाणून घ्या..
कल्की अवतार
कल्की जयंती ही भगवान विष्णूच्या कल्की अवताराच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. कल्की हा भगवान विष्णूचा दहावा आणि शेवटचा अवतार मानला जातो. कलियुगाच्या शेवटी, जेव्हा पृथ्वीवर पापांचा नायनाट होईल, तेव्हा कल्की अवतार प्रकट होईल, असे मानले जाते. भगवान कल्की घोड्यावर स्वार होऊन पृथ्वीवर येतील आणि अधर्माचा नाश करतील. ते पांढऱ्या घोड्यावर स्वार, हातात तलवार, आणि तेजस्वी रूपात प्रकट होतील.
कल्कि जयंतीचे महत्त्व
आज कल्कि जयंती आहे. ही भगवान विष्णूंच्या दहाव्या अवताराचा जन्मदिवस आहे, जो कलियुगात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि पापांचा नाश करण्यासाठी होणार आहे. या दिवशी, भक्त भगवान विष्णू आणि कल्कि अवतार यांची पूजा करतात, उपवास करतात आणि त्यांच्या मंत्रांचा जप करतात. या दिवशी भगवान विष्णू आणि कल्कि अवताराची पूजा करणे शुभ मानले जाते. विष्णू सहस्त्रनाम, विष्णु स्तोत्र आणि कल्कि पुराणाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
शुभ मुहूर्त
पूजेची पद्धत
- सकाळी अंघोळ करून पवित्र वस्त्र परिधान करा.
- भगवान विष्णू किंवा कल्कीचे चित्र/मूर्ती समोर ठेवून पूजन करा.
- पिवळे फुल, तूप दिवा, तुळस, आणि चंदन अर्पण करा.
- “ॐ श्रीं कल्किने नमः” या मंत्राचा जप करा (108 वेळा).
- विष्णुसहस्रनाम, किंवा कल्कि स्तोत्र वाचा.
- देवाला नैवेद्य दाखवावा, ज्यात मिठाई, फळे इत्यादींचा समावेश असावा.
- व्रत ठेवल्यास फळे व तुळशीजलाने उपवास करा.
- संध्याकाळी पुन्हा आरती करावी आणि सर्वांना प्रसाद वाटावा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





