MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

यंदाचा श्रावण महिना केव्हा पासून सुरु होतोय? जाणून घ्या श्रावण महिन्याचं महत्त्व

Published:
भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे. त्यामुळेच या महिन्याचं महत्त्व फार आहे. अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो.
यंदाचा श्रावण महिना केव्हा पासून सुरु होतोय? जाणून घ्या श्रावण महिन्याचं महत्त्व

श्रावणात महादेवांची पूजा भक्त मोठ्या भक्तीभावाने करत असतात. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंध असे अनेक सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात. त्याचप्रमाणे, श्रावणात प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात श्रावण नेमका कधी? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पाहुयात यंदाचा श्रावण महिना केव्हा पासून सुरु होतोय.

महाराष्ट्रात श्रावण कधीपासून?

श्रावण महिना येत्या 25 जुलैपासून सुरु होणार आहे. 25 जुलै श्रावण शुक्ल प्रदिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर, 23 ऑगस्ट 2025 ला श्रावण अमावस्येला या तिथीची समाप्ती होणार आहे. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवार येणार आहेत.

श्रावण महिन्याचं महत्त्व 

श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरमधील एक पवित्र महिना आहे, जो भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात उपवास, पूजा, आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण महिना भगवान शंकराची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. भक्त या महिन्यात शंकराची पूजा, अभिषेक आणि व्रतवैकल्ये करतात. श्रावण महिन्यात उपवास करणे खूप महत्वाचे मानले जाते. अनेक लोक दर सोमवारी उपवास करतात, ज्याला “श्रावणी सोमवार” म्हणतात. श्रावण महिन्यात अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात, जसे नागपंचमी, मंगळागौर, आणि रक्षाबंधन. या महिन्यात धार्मिक कार्यांमुळे आणि उपवासांमुळे मानसिक शांती आणि एकाग्रता वाढते. 

यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार

पहिला श्रावणी सोमवार – 28 जुलै 2025

दुसरा श्रावणी सोमवार – 4 ऑगस्ट 2025

तिसरा श्रावणी सोमवार – 11 ऑगस्ट 2025

चौथा श्रावणी सोमवार – 18 ऑगस्ट 2025

श्रावण महिन्यात काय करावे?

  • भगवान शंकराची पूजा करावी.
  • उपवास करावा.
  • धार्मिक स्थळांना भेट द्यावी.
  • दानधर्म करावा.
  • सात्विक भोजन करावे.
  • प्रार्थना आणि ध्यान करावे. 

श्रावण महिन्यात काय करू नये?

  • तामसिक भोजन (मांस, मद्य) टाळावे.
  • खोटे बोलणे किंवा वाईट विचार करणे टाळावे.
  • गैरवर्तन टाळावे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)